महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

HSC निकाल : औरंगाबाद बोर्डातून परभणी चौथ्यास्थानी, 84.51 टक्के निकाल - परभणी

परभणी जिल्हा औरंगाबाद बोर्डातून चौथ्यास्थानी आला आहे. तर या वेळीही निकालात मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली.

बारावीचा निकाल पाहण्यासाठी झालेली गर्दी

By

Published : May 28, 2019, 7:55 PM IST

परभणी- फेब्रुवारी महिन्यात झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर झाला आहे. यामध्ये परभणी जिल्ह्याचा निकाल 84.5 टक्के लागला असून परभणी जिल्हा औरंगाबाद बोर्डातून चौथ्यास्थानी राहिला आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे या वेळीही निकालात मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली.

बारावीचा निकाल पाहण्यासाठी झालेली गर्दी


परभणी विभागातून 23 हजार 548 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरले होते. त्यापैकी 23 हजार 516 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील एकूण 19 हजार 873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 11 हजार 578 मुले असून 8 हजार 305 मुली आहेत. अर्थात 90.20 टक्के मुली, तर 80.73 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.


परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्याचा निकाल सर्वाधिक 89.78 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मानवत तालुक्याचा 75.60 टक्के लागला आहे. याशिवाय पूर्णा तालुका 79.5, गंगाखेड 79.85, पालम 84.99, सोनपेठ 85.77, जिंतूर 85 तर पाथरी तालुक्‍याचा निकाल 84.15 टक्के एवढा लागला आहे. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा सर्वाधिक 91.72 टक्के तर त्या खालोखाल वाणिज्य शाखेचा 90.97 व कला शाखेचा 76.74 आणि कौशल्य विकास शाखेचा 73.64 टक्के निकाल लागला आहे.


"गुणवत्ता वाढली; चौदाशे विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण"


या वेळच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 1 हजार 411 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय 9 हजार 163 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 9 हजार 12 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. याखेरीज केवळ 287 विद्यार्थी सर्वसाधारण गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. एकूणच या निकालावरून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा टक्का वाढल्याचे दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details