महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कमी पैशात सोनं देण्याच्या बहाण्याने महिलेला लुबाडलं; पाच जणांना पोलीस कोठडी - gold thieves in parbhani

मुंबई येथील एका डॉक्टर महिलेला कमी पैशात सोनं देण्याचं आमिष दाखवून लुटणार्‍या चौघांना न्यायलयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

parbhani police news
कमी पैशात सोनं देण्याच्या बहाण्याने महिलेला लुबाडलं; पाच जणांना पोलीस कोठडी

By

Published : Dec 28, 2020, 7:42 PM IST

परभणी - मुंबई येथील एका डॉक्टर महिलेला कमी पैशात सोनं देण्याचं आमिष दाखवून लुटणार्‍या चौघांना न्यायलयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तीन दिवसांपूर्वी या भामट्यांनी संबंधित महिलेला सेलू येथे एका शेतात बोलावून मारहाण केली. तसेच यावेळी त्यांच्याकडील 8 लाख रुपये पळवले होते.

फसवणूक झालेल्या डॉक्टर महिलेचे नाव उज्वला बोराडे असून त्या मुंबईतील मालाड भागात वास्तव्यास आहेत. मालाड येथे वारंवार औषधोपचारासाठी जाणाऱ्या सेलूतील एका महिलेने त्यांना विश्वासात घेऊन कमी पैशात सोनं देते, म्हणून सेलू येथे बोलावले होते. त्यानंतर त्यांची फसवणूक करून त्यांना लुटल्याचा हा प्रकार उघडकीस आला.

सेलूत बोलवून फसवले

कमी पैशात सोने मिळत असल्याच्या आमिषातून डॉ. उज्वला बोराडे या 25 डिसेंबर रोजी सेलूत काकांसह आल्या होत्या. सेलू-मंठा रस्त्यावरील एका शेतात रात्री त्या सोने घेण्यासाठी गेल्या. यावेळी त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्यांनी हल्ला चढवला. तसेच मारहाण करत डॉ. बोराडे यांच्यासह त्यांच्या काकाजवळील 8 लाख रुपये, मोबाइल घेऊन पोबारा केला. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

तपास अधिकारी सरला गायकवाड, सहाय्यक निरीक्षक विजय रामोड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक व्यंकटेश आलेवार, फौजदार साईनाथ पुयड यांच्यासह कर्मचार्‍यांनी सायबर शाखेच्या मदतीने मुख्य आरोपी सुनिता भोसले आणि अन्य 3 जणांना मोठ्या शिताफीने काल (रविवारी) ताब्यात घेतले.

5 लाख 5 हजार वसूल

मुख्य आरोपी सुनिता भोसले व तिची सहकारी मंजिरी शिंदे या दोन महिलांना जवळा जिवाजी (ता.सेलू) येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 4 लाख 90 हजार रुपये, तर अन्य दोघांना सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी 15 हजार रुपये जप्त केले आहेत. या चौघांना आज (सोमवारी) तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक सरला गाडेकर यांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने चौघांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details