परभणी - शहरात गुरुवारी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येताच जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवसांसाठी संचारबंदी लागू केली. त्याची आज (शुक्रवारी) सकाळी सहा वाजल्यापासूनच कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामध्ये काही अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते. परंतु, त्यामध्ये वर्तमानपत्रे, दूध आणि गॅस-सिलेंडर विक्रेत्यांचा समावेश नव्हता. मात्र, या संदर्भात पुन्हा शुद्धीपत्रक काढून जिल्हाधिकाऱ्यांनी परभणीतील संचारबंदीतून आता वर्तमानपत्रे, दूध आणि गॅस-सिलेंडर विक्रेत्यांना सूट दिली आहे.
परभणीतील 'संचारबंदी'तून वर्तमानपत्रे, दूध आणि गॅस-सिलेंडर विक्रेत्यांना सूट; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - परभणी पहिला कोरोनाग्रस्त
पुणे येथून चोरट्या मार्गाने परभणीत आलेल्या 21 वर्षीय तरुणाला 'कोरोना' झाल्याची बाब गुरुवारी दुपारी स्पष्ट होताच परभणीचे प्रशासन हादरून गेले. अगदी सुरुवातीपासून कोरोनापासून अलिप्त राहणाऱ्या परभणीत आता अचानक 'कोरोना'चा प्रवेश झाल्याची बाब गांभीर्याने घेऊन जिल्हा प्रशासनाने तत्काळ संचारबंदीचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 17 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 19 एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत परभणी महानगरपालिकेच्या हद्दीसह सभोवतालच्या तीन किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू केली.
पुणे येथून चोरट्या मार्गाने परभणीत आलेल्या 21 वर्षीय तरुणाला 'कोरोना' झाल्याची बाब गुरुवारी दुपारी स्पष्ट होताच परभणीचे प्रशासन हादरून गेले. अगदी सुरुवातीपासून कोरोनापासून अलिप्त राहणाऱ्या परभणीत आता अचानक 'कोरोना'चा प्रवेश झाल्याची बाब गांभीर्याने घेऊन जिल्हा प्रशासनाने तत्काळ संचारबंदीचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 17 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 19 एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत परभणी महानगरपालिकेच्या हद्दीसह सभोवतालच्या तीन किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू केली. अर्थात यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्याचे सांगण्यात आले होते. परंतु, त्याबाबत संचारबंदीच्या मुख्य आदेशात स्पष्टीकरण नसल्याने अत्यावश्यक सेवांमध्ये येणार्या वर्तमानपत्र, दूध विक्रेत्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागला. सकाळी 6 वाजताच वर्तमान पत्रे वितरित करणाऱ्या मुलांना पोलिसांनी आडवल्याचे प्रकार घडले. मात्र, यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल दुपारनंतर स्वतंत्र शुद्धीपत्रक काढून वर्तमानपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधी तसेच वितरकांना संचारबंदीतून सूट देण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, यासंदर्भात पोलिसांकडे आदेश उशिरा पोहोचल्याने सकाळी पोलिसांनी वर्तमानपत्रांच्या वितरकांना कठोर वागणूक दिली.
पोलिसांनी आज (शुक्रवारी) यासंदर्भात सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्याने ही बाब स्पष्ट झाली. तसेच आज शहरातील गॅस एजन्सीधारकांकडून वितरित होणारे गॅस-सिलेंडर आणि सभोवतालच्या खेड्यांमधून येणाऱ्या दूध विक्रेत्यांना देखील वगळण्यात आल्याचे लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. यामध्ये दूध विक्रेत्यांना सकाळी 6 ते 9 अशा तीन तासात दूध वितरणाचे काम करून परत जाण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे अत्यावश्यक सेवेतील या तीनही बाबी नागरिकांना नेहमीप्रमाणे उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.