महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणी कोरोना अपडेट: 191 नवे कोरोनाबाधित; 280 कोरोनामुक्त तर 3 जणांचा मृत्यू - परभणी कोरोना अपडेट

परभणी जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. आज शुक्रवारी 191 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 280 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Parbhani Corona Update
Parbhani Corona Update

By

Published : May 28, 2021, 9:16 PM IST

परभणी - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. आज शुक्रवारी 191 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 280 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, समाधानाची बाब म्हणजे मृत्यूदर कमी झाला असून, गेल्या 24 तासात केवळ तीन बधितांच्या मृत्यूची नोंद झाली.

3 हजार 718 ॲक्टिव्ह रुग्ण -

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 49 हजार 714 वर पोहचली असून, त्यातील 44 हजार 773 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या 3 हजार 718 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून कोरोनाचा संसर्ग कमी होत होता. दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 200 आत पोहचली होती. मात्र मागील आठवड्यातील शनिवारपासून रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली होती. तसेच नव्या बाधितांपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्यांची वाढलेली संख्या देखील पुन्हा घटली होती. मात्र काल गुरुवारपासून परिस्थिती पुन्हा आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी नव्या 122 रुग्णांची भर पडली तर 253 जण कोरोनामुक्त झाले. त्याप्रमाणेच आज शुक्रवारी देखील 280 जण कोरोनामुक्त झाले असून, 122 नव्या बधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाल्याचे दिसून येत आहे.

3 लाख 38 हजार 822 जणांची तपासणी -

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचे रुग्ण ज्या प्रमाणात वाढत होते, आता त्या प्रमाणात मे महिन्यात घटत आहेत. शुक्रवारी 122 नवीन बाधित आढळले तर 280 कोरोनामुक्त झाले. तसेच गेल्या 24 तासात 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांच्या कोरोना कक्षात 3 हजार 718 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एकूण 1 हजार 223 करोनाबाधितांचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 49 हजार 714 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 44 हजार 773 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 3 लाख 38 हजार 822 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 88 हजार 915 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 49 हजार 714 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 1144 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले. दरम्यान, गेल्या 24 तासात जिल्ह्यात 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यात 2 पुरुष, 1 महिलांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details