परभणी - 'कोरोना' चा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि मनपा प्रशासनाने 3 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. या ठिकाणी वाहनधारकांची चौकशी करून, त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आज तब्बल 632 विनाकारण शहरात फिरणाऱ्या वाहनधारकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच काही वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.
गांधी पार्क येथे 300 जणांची कोरोना चाचणी
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी पार्क येथे किरकोळ कारणासाठी फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या भागातून अनेक तरूण मोटरसायकलवर विनाकारण फिरताना आढळून येतात. वारंवार सांगून देखील ऐकत नसल्याने, नानलपेठ पोलीस आणि मनपाच्या संयुक्त पथकाने या ठिकाणी आरटीपीसीआर तपासणी शिबिर लावले होते. तसेच नाकाबंदी करून येणार्या-जाणार्या प्रत्येक वाहनधारकांची चौकशी करण्यात येत होती. यामध्ये सुमारे 300 वाहनधारक रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळून आले. त्यामुळे त्यांची आरटीपीसीआर तपासणी करून वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. या ठिकाणी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुऱ्हा आणि पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
जाम नाक्यावर 160 जणांची कोरोना चाचणी