परभणीत काँग्रेसकडून मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या कार्यकाळाचा निषेध - भाजप सरकार
केंद्रातील भाजप सरकारने आज सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मात्र, या कार्यकाळात मोदी सरकारने दाखवलेल्या स्वप्नांची कुठलीही पूर्तता केलेली नाही. याबद्दल मोदी सरकारचा निषेध करत परभणीत काळ्या रुमाल घालून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
परभणी -केंद्रातील भाजप सरकारने आज सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मात्र, या कार्यकाळात मोदी सरकारने दाखवलेल्या स्वप्नांची कुठलीही पूर्तता केलेली नाही. याबद्दल मोदी सरकारचा निषेध करत परभणीत काळ्या रुमाल घालून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन पार पडले.
जनतेच्या अपेक्षा भंग झाल्याचा आरोप -
दरम्यान, 'मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कार्यकाळात जनतेच्या अपेक्षा भंग झाल्याचा आरोप करत हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांनी विविध सात मागण्यांसाठी हे आंदोलन केल्याची माहिती दिली. या आंदोलनादरम्यान मोदी सरकारने जनतेला विविध विकासाची दाखवलेली स्वप्ने पूर्ण फोल ठरल्याचा आरोप केला.