परभणी- देशातील सर्वाधिक इंधनाचे दर परभणीत असतात. साहजिकच इंधन दरवाढीचा सर्वाधिक फटका शहरातील नागरिकांना बसतो. देशात इंधनाचे दर वाढल्यानंतर शहरात आज 92.16 रुपये प्रति लिटर पेट्रोलचा दर आहे. हा देशातील सर्वाधिक पेट्रोलचा दर आहे.
देशात पेट्रोल-डिझेलचे सर्वाधिक दर परभणीत; उपाययोजना करण्याची नागरिकांमधून मागणी - परभणी पेट्रोल दर न्यूज
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतच चालल्या आहेत. कोरोना काळात पेट्रोल-डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. राज्यातील सात जिल्ह्यामध्ये डिझेलचे दर 80 रुपयांच्या वर गेले आहेत. परभणीत देशात सर्वाधिक महाग पेट्रोल असल्याचे समोर आले आहे.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतच चालल्या आहेत. कोरोना काळात पेट्रोल-डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. राज्यातील सात जिल्ह्यामध्ये डिझेलचे दर 80 रुपयांच्या वर गेले आहेत. परभणीत देशात सर्वाधिक महाग पेट्रोल असल्याचे समोर आले आहे. शहरात आज (शनिवारी) तब्बल 92.16 रुपये प्रति लिटर पेट्रोलचा दर आहे. त्यामुळे 'जगात जर्मनी भारतात परभणी' उगाच नाही म्हणत, असे म्हण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे. टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत महागडे इंधन घेणे परवडत नसल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहेत.
इंधनाचा पुरवठा करणारे डेपो दूर असल्याने परभणीत इंधन महाग-
परभणी जिल्ह्यात मनमाड आणि सोलापूर आदी भागातून इंधनाचा पुरवठा होत असतो. या दोन्ही ठिकाणचे डेपो परभणीपासून जवळपास तीनशे ते चारशे किलोमीटर दूर आहेत. परभणीत येणाऱ्या इंधनासाठी वाहतूक खर्च सर्वाधिक आहे. हा खर्च सरकारी तेल कंपन्या पेट्रोल पंप चालकांकडून तर पेट्रोल पंप चालक हे ग्राहकांकडून वसूल करतात. त्यामुळे परिसरातील जिल्ह्यांसाठी या ठिकाणी इंधन डेपो उभारावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे सरकार नेहमीच दुर्लक्ष करताना दिसत आहे.