परभणी - छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यावरून भाजपचे जय भगवान गोयल हे राज्यभर टीकेचे धनी झाले आहेत. याचे पडसाद परभणीत देखील शिवजन्मोत्सव समिती आणि शिवप्रेमी तरुणांनी गोयल यांच्या फोटोला जोडे मारून त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाचा निषेध केला.
परभणीमध्ये वादग्रस्त पुस्तकाचे लेखक गोयल यांच्या फोटोला जोडे मारून निषेध हेही वाचा - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाविरूद्ध संतापाची लाट; राज्यात ठिकठिकाणी आंदोलन
परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सोमवारी 'आज के शिवाजी, नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांचा जाहीर निषेध करण्यात आला. गोयल यांच्या फोटोला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणा सोबतही करू नये, त्यांच्याशी तुलना करणे म्हणजे महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. याचा आम्ही निषेध नोंदवत असल्याची भावना यावेळी तरुणांनी व्यक्त केली. हा निषेध नोंदविण्यासाठी मराठा मोर्चाचे सुभाष जावळे, विलास पाटील, गजानन जोगदंड आदींसह सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती व शिवप्रेमी तथा शिवभक्त तरुण उपस्थित होते.
हेही वाचा - 'देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना निधी दिला नाही; मात्र, असलेला निधी पळवून नेला'