परभणी- जवळपास पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात परतलेली मूकबधीर तरुणी गीता आपल्या कुटुंबाच्या शोधात महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या दौऱ्यावर आहे. या अंतर्गत ती उद्या सोमवारी परभणी जिल्ह्यात येणार आहे. याठिकाणी परभणी रेल्वे स्थानकासह पूर्ण आणि गंगाखेड रेल्वेस्थानक आणि शहरात फिरून ती तिच्या कुटुंबाचा शोध घेणार असल्याची माहिती इंदोर येथील आनंद सेवा सोसायटीच्या ग्यानेंन्द्र पुरोहित यांनी दिली.
पाकिस्तानातून परतलेल्या गीता कुटुंबाच्या शोधात सोमवारी परभणीत - परभणी गीता बातम्या
गीताचा सांभाळ करणाऱ्या इंदोर येथील आनंद सेवा सोसायटीच्या म्हणण्यानुसार, तिने तिच्या घराजवळ रेल्वे स्थानक असून परिसरात ऊस, तांदूळ आणि शेंगदाण्याचे पीक घेतले जात असल्याचे सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील अशा दृश्यांची सर्व ठिकाणे गीताला दाखविण्यात येत आहेत.
गीताचा सांभाळ करणाऱ्या इंदोर येथील आनंद सेवा सोसायटीच्या म्हणण्यानुसार, तिने तिच्या घराजवळ रेल्वे स्थानक असून परिसरात ऊस, तांदूळ आणि शेंगदाण्याचे पीक घेतले जात असल्याचे सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील अशा दृश्यांची सर्व ठिकाणे गीताला दाखविण्यात येत आहेत. त्यानुसार परभणी शहरातील तसेच गंगाखेड आणि पूर्णा येथे रेल्वे स्थानकदेखील तिला दाखवून या गावांमध्ये तिला फिरवून तिच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी गीताच्या सोबत आनंद सेवा सोसायटीचे अधिकारी उद्या (सोमवारी) दुपारी सचखंड एक्सप्रेसने परभणीत दाखल होणार आहेत.
आनंद सेवा सोसायटी घेते गीताची काळजी -
मध्य प्रदेशच्या सामाजिक न्याय आणि दिव्यांग लोककल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्यानुसार, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या इंदौरमधील आनंद सेवा सोसायटीकडून गीताची काळजी घेतली जाते. या स्वयंसेवी संस्थेवर गीताच्या आई-वडिलांना शोधण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. गीताच्या हावभावावरून काढावा लागतोय माग, गीताने इशाऱ्याद्वारे आपण राहत असलेल्या भागांसंबंधी काही संकेत दिले आहेत. तिच्या मूळ गावाजवळ ऊस, तांदूळ आणि शेंगदाण्याचे पीक घेतले जात असावीत. दरम्यान, गीता ही तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूची प्रशंसक आहे. गीताच्या हावभावानुसार तिच्या घरात इडली, डोसासारखे दक्षिण भारतीय पदार्थ बनवले जातात.
गीताचे हावभाव आणि इशाऱ्यावरून तिच्या कुटुंबाचा घेतला जातोय शोध -
गीताच्या नाकाला उजवीकडे छिद्र केले आहे. त्यानुसार मूकबधीर महिलांच्या मते तिच्या मूळ गावाजवळ ऊस, तांदूळ आणि शेंगदाण्याचे पीक घेतले जात असावीत. दरम्यान, गीता ही तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूची प्रशंसक आहे. गीताच्या हावभावानुसार तिच्या घरात इडली, डोसासारखे दक्षिण भारतीय पदार्थ बनवले जातात. तसेच लहानपणीच्या पुसट आठवणींद्वारे गीताने आपल्या गावाजवळ एक रेल्वे स्थानक आणि गावातील नदीच्या किनाऱ्यावर एक मंदिर असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार सुरुवातीला गीताला नांदेड आणि जालना जिल्ह्यातील रेल्वे स्थानक असणाऱ्या परिसरात आणले होते. यानंतर तेलंगाणाच्या सीमाभागात गीताच्या कुटुंबाचा शोध घेतला होता.
गीता आमची असल्याचा 20 कुटुंबांनी केला दावा -
गेल्या पाच वर्षांत देशाच्या विविध भागातील सुमारे वीस कुटुंबांनी गीताला त्यांची हरवलेली मुलगी असल्याचे सांगितले होते. मात्र, यातील एकाही कुटुंबाचा गीतावर असलेला दावा तपासात सिद्ध होऊ शकलेला नाही.
काय आहे गीता प्रकरण -
गीता सध्या ३० वर्षे वयाची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ती बालपणी चुकीने रेल्वेगाडीत बसून सुमारे २० वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गेली होती. पाकिस्तानी रेंजर्सला ती लाहोर रेल्वे स्थानकावर समझोता एक्स्प्रेसमध्ये बसलेली आढळली होती. देशाच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ती 26 ऑक्टोबर 2015 रोजी भारतात परत आली होती. त्यानंतर ती इंदौरमधील स्वयंसेवी संस्थेत वास्तव्य करत आहे व आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत देशाच्या विविध भागांत फिरत आहे.