परभणी - जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे वयोवृद्ध व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. कुंडलिक भिवाजी खाडे (वय ६०), असे या वयोवृद्धाचे नाव आहे. जिल्ह्यातील उष्माघाताचा हा चौथा बळी आहे.
परभणीत उष्माघाताचा चौथा बळी; चारठाणा येथे वृद्धाचा मृत्यू - jintur
परभणी जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात चार वृद्धांचा उष्माघाताने बळी गेला आहे.
खाडे हे सोमवारी नेहमीप्रमाणे आपल्या हेअर कटिंग सलूनमध्ये दैनंदिन काम करत होते. त्यांना दुपारी अचानक उष्माघाताचा त्रास सुरू झाला. त्यांच्यावर प्रथोमपचार करण्यापूर्वीच त्रास वाढल्याने त्यांचा दुकानातच मृत्यू झाला. यामुळे चारठाणा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
खाडे यांच्या मृत्यूनंतर उष्माघाताने मरण पावणाऱ्यांची संख्या चार झाली आहे. यापूर्वी सोनपेठ, गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.