परभणी- परभणीतील जिंतूर रस्त्याकडे जाणाऱ्या उड्डाण पुलावर सोमवारी रात्री साडेदहा वाजता एका दुचाकीचा अपघात होऊन तरुण जागीच ठार झाला. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
परभणीच्या उड्डाणपुलावर अपघात, दुचाकीस्वार ठार - मंगेश दळवी
परभणीतील जिंतूर रस्त्याकडे जाणाऱ्या उड्डाण पुलावर सोमवारी रात्री साडेदहा वाजता एका दुचाकीचा अपघात होऊन तरुण जागीच ठार झाला.

हा तरुण हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. मंगेश दळवी असे त्याचे नाव आहे. हा तरुण सोमवारी रात्री 10.30 वाजता उड्डाण पुलावरून आपल्या दुचाकीने भरधाव जात असताना त्याची गाडी घसरुण अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. परंतु, त्याला एखादे मोठे वाहन धडक देऊन निघून गेले का? याचाही पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच मरण पावला. कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला जिल्हा रुग्णालयात हलवले. मध्यरात्री त्याच्यावर शवविच्छेदन झाले असून पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आहे.
हेही वाचा - परभणी : कचरा वाहतूक टेम्पोने धडक दिल्याने सायकलस्वार मुलीचा मृत्यू