महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रीय विज्ञान दिवस : परभणीतून 60 विद्यार्थ्यांची विज्ञानवारी रवाना; डॉ. नारळीकरांशी साधणार संवाद - आयुका पुणे

आज (२८ फेब्रुवारी) राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्यानिमित्त परभणीतील अ‌ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्यावतीने ६० विद्यार्थ्यांच्या चमू पुण्यातील 'आयुका'साठी रवाना झाली आहे. याठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

astronomical science tour, राष्ट्रीय विज्ञान दिवस
परभणीतून 60 विद्यार्थ्यांची विज्ञानवारी रवाना

By

Published : Feb 28, 2020, 10:03 AM IST

परभणी- विज्ञानवारीतून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन अवगत व्हावा, यासाठी अ‌ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्यावतीने 60 विद्यार्थ्यांची चमू आज पुणे येथे 'आयुका'(इंटर युनिर्व्हसिटी सेंटर फॉर अ‌ॅस्ट्रॉलॉजी अँड अ‌ॅस्ट्रोफिजिक्स)साठी रवाना झाली. तब्बल 2500 जणांची ऑनलाइन परीक्षा घेऊन या गुणवंत विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या विज्ञानवारीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. दरम्यान, या विद्यार्थ्यांना 'आयुका'चे संस्थापक तथा प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

परभणीतून 60 विद्यार्थ्यांची विज्ञानवारी रवाना; डॉ. नारळीकरांशी साधणार संवाद

विज्ञानवारीतून देशाचे भविष्य, विज्ञाननिष्ठ आणि सक्षम नागरिक घडणार आहेत. यामधूनच भविष्यातील वैज्ञानिक तयार होतील, अशी आशा पृथ्वीराज यांनी व्यक्त केली. अ‌ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक यांनी गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोणासोबतच मूलभूत विज्ञान विषयाची गोडी निर्माण व्हावी आणि लिगो इंडिया यासारख्या खगोलीय विषयांच्या संस्थांमध्ये मुलांना करियर करता यावे, यासाठी असे उपक्रम आम्ही राबवत असल्याचे नाईक यांनी सांगितले.

दरम्यान, या विज्ञानवारीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांची शालेय ज्ञानावर आधारित वस्तूनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेच्या आधारावर 11 फेब्रुवारीला परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील 60 केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये तब्बल 2500 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यामधून सोसायटीचे परीक्षा समन्वयक प्रसाद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली 60 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विनामूल्य 'आयुका' विज्ञानवारीसाठी निवडण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना 'आयुका'चे संस्थापक अध्यक्ष डॉ.जयंत नारळीकर यांच्याशी 'द सायंटिस्ट अस्क' मध्ये संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. तसेच एनसीआरचे प्रख्यात संशोधक तथा खगोलशास्त्रज्ञ डॉ. योगेश वाडेकर व डॉ. गीता महाशब्दे यांचे देखील मार्गदर्शन मिळणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

याप्रसंगी परभणी 'आयएमए'चे अध्यक्ष डॉ. बी. एम. मोरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये का? आणि कसे? याची जाणीव निर्माण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. संबंधित विज्ञानवारीला वसमत रोडवरील सारंग स्वामी विद्यालयातून हिरवी झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, संजय ससाने, प्राचार्य बाळासाहेब जाधव, डॉ. बापूराव मोरे, नागेश वाईकर, सुधिर सोनुनकर, क्षीरसागर, डॉ.पी.आर. पाटील, प्रसन्न भावसार, दिपक शिंदे, अशोक लाड, गारकर, डॉ.रणजित लाड, डॉ.अंकित मंत्री, डॉ.विजय नरवाडे, वेदप्रकाश आर्य, डॉ.जगदिश नाईक, डॉ.कनसटवाड, डॉ. आनंद आणेराव, डॉ. रणजीत कारेगावकर आदींसह खगोलप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details