परभणी - जिल्ह्यात एप्रिल महिन्यात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने मे महिन्याच्या सुरुवातीपासून काहिसा दिलासा दिल्याचे चित्र आहे. गेल्या 15 दिवसांपासून नव्याने आढळून येणाऱ्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज (15 मे) 844 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर नवीन 563 बाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान, 15 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
3 हजार 578 रुग्ण अॅक्टिव्ह
आज 563 नवीन रूग्ण आढळले. 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 3 हजार 578 रूग्ण उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एकूण 1 हजार 117 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 45 हजार 915 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या. त्यापैकी 41 हजार 220 कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 75 हजार 358 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 29 हजार 278 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 45 हजार 915 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 1116 नमुने अनिर्णायक आहेत. तर 140 नमुने नाकारण्यात आले.