महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत सोमवारी 54 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर 141 रुग्ण कोरोनामुक्त - परभणी कोरोना बातम्या

सोमवारी 54 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 141 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. तसेच गेल्या 24 तासांत 3 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

parbhani corona news
परभणीत सोमवारी 54 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर 141 रुग्ण कोरोनामुक्त

By

Published : May 31, 2021, 10:00 PM IST

परभणी -जिल्ह्यात सोमवारी 54 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 141 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. तसेच गेल्या 24 तासांत 3 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नव्याने आढळणाऱ्या बधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच मृत्यूदरदेखील कमी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणेवरील ताणदेखील कमी झाला आहे.

सद्या 3 हजार 134 सक्रिय रुग्ण -

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 49 हजार 923 वर पोहचली असून त्यातील 45 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात सध्या 3 हजार 134 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मार्च आणि एप्रिल महिन्यात वाढलेला कोरोनाबधितांचा आकडा मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून कमी होत गेला. दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यात 200 च्या आत गेली. तर ती या आठवड्यात 100 च्या आत पोहचली आहे. या अंतर्गत सोमवारी नव्या 54 रुग्णांची भर पडली, तर 3 जणांचा मृत्यू झाला. शिवाय 141 जण कोरोनामुक्त झाले.

3 लाख 42 हजार 570 जणांची तपासणी -

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचे रुग्ण ज्या प्रमाणात वाढत होते, आता त्या प्रमाणात मे महिन्यात घटत आहेत. आज सोमवारी 54 नवीन बाधित आढळले. तर 141 कोरोनामुक्त झाले. तसेच गेल्या 24 तासांत 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांच्या कोरोना कक्षात 3 हजार 134 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एकूण 1 हजार 231 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 49 हजार 923 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले आहेत. त्यापैकी 45 हजार 558 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 3 लाख 42 हजार 570 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 92 हजार 460 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 49 हजार 923 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 1148 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले. दरम्यान, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात ज्या 3 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला, त्यात 2 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे.

हेही वाचा - बाबो! एक दोन नाही तर या महिलेने दिला तीन बाळांना जन्म

ABOUT THE AUTHOR

...view details