महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत आढळला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; अजून 309 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा

61 संशयितांचे अहवाल अनिर्णायक असून 25 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचा अहवाल मिळाला आहे. सध्या जिल्हा शासकीय रूग्णालयात विलगिकरण कक्षात 485, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 383 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 1 हजार 320 जण असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

parbhani covid 19
परभणीत शुक्रवारी सापडला एक पॉझिटिव्ह रुग्ण

By

Published : May 29, 2020, 7:00 PM IST

परभणी - दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज शुक्रवारी सायंकाळी परभणी जिल्ह्यात एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 68 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यापैकी एक मृत तर एक जण ठणठणीत बरा होऊन घरी परतला आहे. मात्र, अजूनही जिल्ह्यातील तब्बल 309 संशयित रुग्णांच्या स्वॅबच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याने परभणीकरांची धाकधूक कायम आहे.

दरम्यान, येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर आज शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60 नवीन संशयीत दाखल झाल्याने आजपर्यंतच्या संशयितांची संख्या 2 हजार 188 वर पोहचली आहे. यातील 309 संशयितांच्या स्वॅबचे अहवाल अजूनही प्रलंबित आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 1 हजार 819 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर 68 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. 61 संशयितांचे अहवाल अनिर्णायक असून 25 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचा अहवाल मिळाला आहे. सध्या जिल्हा शासकीय रूग्णालयात विलगिकरण कक्षात 485, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 383 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 1 हजार 320 जण असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

विशेष म्हणजे आज शुक्रवारीदेखील नवीन 80 संशयितांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. तर आज शुक्रवारी 38 जणांचे स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. त्यात 37 निगेटीव्ह तर एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ज्यामध्ये वाघी बोबडे येथील 60 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. संबंधित व्यक्ती 15 मे रोजी पनवेल येथून परतला असून गावातच क्वारंटाईन झाला होता. मात्र त्याला हृदयविकाराचा त्रास असल्याने परभणीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांना कोरोनाबाबत शंका वाटल्याने या व्यक्तीस जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details