महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत कोरोना रुग्णांचा उच्चांक; नवे 1 हजार 172 कोरोनाबाधित; 20 जणांचा मृत्यू - corona patient deaths in Parbhani

गेल्या आठवडाभरात शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. बुधवारी नवीन रुग्णसंख्या वाढीबरोबर मृत्यूचा नवा उच्चांक गाठला आहे.

Parbhani gov hospital
परभणी जिल्हा रुग्णालय

By

Published : Apr 15, 2021, 12:30 AM IST

परभणी - जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1 हजाराहून अधिक रुग्ण सापडण्याचा उच्चांक झाला आहे. बुधवारी तब्बल 1 हजार 172 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे

गेल्या आठवडाभरात शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत.

हेही वाचा-भाजप नेत्यांकडून त्यांच्या आमदारांना गाजर दाखवण्याचे काम - उपमुख्यमंत्री

सव्वापाच हजार रुग्णांवर उपचार सुरू -

दरम्यान, आज एका दिवसातील सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून येण्यासोबतच सर्वाधिक मृत्यूदेखील झाले आहेत. गेल्या 24 तासात तब्बल 20 जणांचे मृत्यू झाले आहेत. यात 14 पुरुष व 6 महिलांचा समावेश आहे. तर आजपर्यंत एकूण 579 करोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 22 हजार 826 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 16 हजार 954 व्यक्ती करोनामुक्त झाल्या आहेत. तर सध्या जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांच्या कोरोना कक्षात 5 हजार 293 बाधित उपचार घेत आहेत.

हेही वाचा-विमानात झाली पुत्रप्राप्ती, आईवडील जन्म प्रमाणपत्रासाठी झिजवताहेत चपला

2 लाख 3 हजार व्यक्तींचे नमुने तपासले -

परभणीच्या जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आजपर्यंत 2 लाख 2 हजार 950 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यात 1 लाख 79 हजार 537 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले. तर 22 हजार 678 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. याशिवाय 595 व्यक्तींचे नमुने निर्णय आणि 140 नमुने नाकारण्यात आले आहेत.

प्रलंबित नमुन्यांमुळे वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा -

मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या आहेत. परंतु, जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा सक्षम नसल्याने या तपासण्यांचे अहवाल 15 ते 20 दिवसांनंतर प्राप्त होत आहेत. जुन्या तपासण्यांचे अहवाल येत असल्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याचे दिसून येते. बुधवारी 3 हजार 158 नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. आरटीपीसीआरच्या 2 हजार 419 अहवालांमध्ये 888 आणि रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टच्या 739 अहवालांमध्ये 284 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

4 हजार 111 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये -

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 22 हजार 826 झाली आहे. त्यातील 16 हजार 954 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आजपर्यंत 579 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या 5 हजार 293 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. यात परभणीच्या जिल्हा रुग्णालयात 146, आयटीआय हॉस्पिटलमध्ये 148, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये 228, अक्षदा मंगल कार्यालयात 132 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे 4 हजार 111 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्ण जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details