परभणी -महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा परभणी-हिंगोली-नांदेड जिल्ह्यातील आगामी दौरा चांगलाच वादात सापडला आहे. या संदर्भात मुंबईत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या या दौऱ्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आढावा घेण्याच्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. तर आता परभणीतील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के यांनी राज्यपालांना या दौऱ्यात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
'समांतर यंत्रणा भासवण्याचा प्रयत्न आहे का?'
'महाराष्ट्रात दोन समांतर यंत्रणा कार्यरत असल्याचे भासवण्याचा हा राज्यपालांचा प्रयत्न आहे का? असा सवाल देखील परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत उपस्थित केला आहे. त्यामुळे राज्यपालांच्या परभणीसह तीन जिल्ह्यांतील या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद आणि संघर्ष काही केल्या संपत नाही. उलट तो वाढत आहे. विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्त्या असो की मग राज्यातील इतर प्रश्न, कोश्यारी यांनी नेहमीच राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. आता तर उद्धाटनाच्या कार्यक्रमाला जातांनाच तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका देखील ते घेणार आहेत.
कोश्यारी यांचा 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान दौरा-