परभणी - इंधन दरवाढ रोखण्यास केंद्रातील भाजपा सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत परभणीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. खासदार फौजिया खान, शहर जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या परिसरात हे आंदोलन पार पडले.
परभणीत राज्यातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल
गेल्या वर्षापासून देशातील पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. तर गृहिणींचे आर्थिक बजेट ढासळले आहे. इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. यातच परभणीत राज्यातील सर्वात महाग पेट्रोल म्हणजेच १०७.५७ रुपये लिटर, तर डिझेलही ९७.४८ रुपये आहे. लवकरच डिझेल शंभरी पार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सर्वच जीवनाश्यक वस्तूंच्या किमंतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. याला केंद्र सरकार जबाबदार आहे. यातच कोरोना महामारीमुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद असल्याने बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
'भाजपा सरकारकने करून दाखवले'