परभणी- आजवर विकासाच्या संकल्पनेत आरोग्य सेवांसाठी अधिक दक्षता घेण्याची गरज काळाने दाखवून दिली आहे. ही गरज लक्षात घेवून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधा आणि सरकारी रुग्णालये अद्ययावत करणार असल्याची ग्वाही राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली. याच दृष्टीने जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय साकारावे, या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचेदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आरोग्य सुविधांसह सरकारी रुग्णालय अद्ययावत करणार - पालकमंत्री नवाब मलिक - Nawab Malik over corona vaccinaition
पालकमंत्री नवाब मलिक म्हणाले की, देशातील जनतेने आपापली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडल्याने लोकशाही यशस्वी होण्यास मदत झाली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक घटकाला समान संधी मिळाली पाहिजे, यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातआज (मंगळवारी) प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना पालकमंत्री नवाब मलिक म्हणाले की, देशातील जनतेने आपापली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडल्याने लोकशाही यशस्वी होण्यास मदत झाली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक घटकाला समान संधी मिळाली पाहिजे, यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
पुढे पालकमंत्री मलिक म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करत असतात, अशा शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळात एक नवीन योजना आखून त्यांना न्याय देण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाणार असल्याचेही पालकमंत्री नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले. भारतीय बनावटीची कोरोना लस ही अत्यंत सुरक्षित आहे. कुठल्याही अफवांना बळी पडू नये. कोरोनापासून आपला व कुटुंबातील सदस्याचा बचाव करण्यासाठी कोरोना लस सर्वांनी टोचून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.