महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाथरीत आगार प्रमुखाच्या त्रासाला कंटाळून चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; कारवाईची मागणी - Giriraj Bhagat

आगारप्रमुखासह इतर वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून दिला जाणाऱ्या त्रासाला कंटाळून एस.टी. चालकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन मावळा संघटनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.

तहसिलदारांना निवेदन देताना

By

Published : Jun 26, 2019, 8:24 AM IST

परभणी- पाथरी येथील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे आगार प्रमुख चौरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून पाथरी आगारातील चालक प्रल्हाद अवचार यांनी अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी आगर प्रमुख चौरे व त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांचावर कडक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मावळा संघटनेचा वतीने मंगळवारी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

येथील आगार प्रमुख चौरे आणि त्यांचे सहकारी या आगारात चालक असलेल्या अवचार यांच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. यास कंटाळून त्यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येत्या २८ तारखेपर्यंत या अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास मावळा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मावळा संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अमोल भाले पाटील यांनी दिली आहे. यावेळी मावळा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष अतुल टेकाळे, तुकाराम पौळ, अनिल घाडगे, पांडुरंग गलबे आदी लोकांची उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details