परभणी- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने बधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात गुरुवारी तब्बल 1265 नवे रुग्ण आढळले, तर 21 रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 489 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. दरम्यान, कोरोना रुग्णालयामध्ये अजूनही 304 बेड शिल्लक असल्याची माहिती आहे.
परभणीत 1265 नवे कोरोनाबाधित; 21 रुग्णांचा मृत्यू तर 489 कोरोनामुक्त
परभणी जिल्ह्यात गुरुवारी तब्बल 1265 नवे रुग्ण आढळले, तर 21 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयात अजूनही 304 बेड शिल्लक असल्याची माहिती आहे.
आतापर्यंत 872 बधितांची मृत्यू-
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असून गुरुवारी 1265 नवीन बाधित आढळले तर 21 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 872 बधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 7 हजार 846 बाधित उपचार घेत आहेत. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 35 हजार 435 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 26 हजार 117 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 39 हजार 627 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 4 हजार 193 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 35 हजार 435 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 950 नमुने अनिर्णायक आहेत तर 140 नमुने नाकारण्यात आले.
'या' रुग्णालयात झाले कोरोनाबधितांचे मृत्यू -
जिल्ह्यात गेल्या 24 तासात 21 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यात 14 पुरुष तर 7 महिलांचा समावेश आहे. यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना रुग्णालय (7), आयटीआय इमारतीमधील कोरोना रुग्णालय (5) आणि जिल्हा परिषदेच्या कोरोना रुग्णालयमध्ये (1) असे 13 रुग्णांचा मृत्यू झाला, तसेच चिरावू, अबोली, सिद्धिविनायक, पाडेला, स्वाती, पार्वती आणि देहरक्षा या खासगी रुग्णालयमध्ये एकूण 8 रुग्ण दगावले आहेत.
जिल्ह्यात 304 बेड शिल्लक -
परभणीमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना रुग्णालयासह खासगी मंगल कार्यालय आणि इतर इमारतीमधून 30 कोरोना रुग्णालय सुरू आहेत. ज्यामध्ये 7 हजार 846 रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्व 30 रुग्णालयांमध्ये आणि घरी राहणाऱ्यांसाठी 8 हजार 150 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी सध्या केवळ 304 बेड रिकामे आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक बेड रेणुका रुग्णालय येथे 85 बेड रिकामे असून, तसेच जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय रुग्णालयात 63 बेड शिल्लक आहेत. याशिवाय जिल्हा रुग्णालयात 2, जिल्हा परिषद कोरोना रुग्णालय 23, भारत रुग्णालय 21, पाडेला 4, डॉ. प्रफुल पाटील रुग्णालय 26 देशमुख 2, अक्षदा मंगल कार्यालय 21, मोरे 3, अनन्या 2, सामाले रुग्णालय 2, सिद्धिविनायक 3, ह्यात 2, सुरवसे मॅटर्निटी 4, देहरक्षा रुग्णालय 16, स्पर्श रुग्णालय 8, तर गोकुळ रुग्णालयात 3 तर पार्वती रुग्णालयात 4 बेड शिल्लक आहेत. त्यामुळे नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांनी बेड शिल्लक नसल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता या रुग्णालयांमध्ये संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. याशिवाय 6 हजार 313 रुग्ण घरून (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत.