परभणी -जिल्ह्यात बुधवारी 453 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 22 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1072 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, गेल्या 11 दिवसांप्रमाणे आजदेखील नवीन बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे मृत्यूचे प्रमाण कायम असल्याने चिंतादेखील व्यक्त होत आहे.
4 हजार 703 कोरोनाबाधितांवर उपचार -
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मार्च महिण्याच्या शेवटच्या आठवड्यापासून वाढत आहे. त्यात एप्रिल महिन्यात प्रचंड वाढ झाली. मात्र, आता बधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 44 हजार 416 वर पोहचली असून, त्यातील 4 हजार 703 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून यात काहीसा दिलासा मिळताना दिसून येत आहे. 1 मेपासून आजपर्यंत दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या काळात नव्याने 8053 बाधित आढळले, तर 11 हजार 348 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
22 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू -
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण ज्या प्रमाणात वाढत होते, आता त्याचे प्रमाणात घटताना दिसून येत आहेत. बुधवारी 453 नवीन कोरोनाबाधित आढळले, तर 1072 कोरोनामुक्त झाले. तसेच गेल्या 24 तासांत 22 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 4 हजार 703 बाधित सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एकूण 1 हजार 75 करोनाबाधितांचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 44 हजार 416 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 38 हजार 638 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 69 हजार 268 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 24 हजार 733 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 44 हजार 416 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 1070 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले.