महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कारागृहातून निवडणूक जिंकणारे आमदार गुट्टे अखेर बाहेर; सर्वोच्च न्यायालयाने दिला जामीन - शेतकरी कर्ज फसवणूक प्रकरण

शेतकरी कर्ज फसवणूक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले उद्योजक आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे. ते मागील मागील ३४६ दिवसांपासून कारागृहात होते.

आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना जामीन
आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना जामीन

By

Published : Mar 6, 2020, 3:40 AM IST

परभणी - कारागृहातूनच गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवणारे आणि जिंकणारे उद्योजक आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे. गंगाखेड शुगर कारखान्याला ऊस देणाऱ्या हजारो शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार गुट्टे मागील ३४६ दिवसांपासून कारागृहात होते.

आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना जामीन

२०१७ मध्ये आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याने २९ हजार शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर ३२८ कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. सहा बँकाकडून बनवाट कागदपत्राच्या आधारे ही कर्ज प्रकरणे मंजूर करून घेण्यात आली होती. कारखान्याच्या संचालक मंडळाने आणि बँकांच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करुन हा मोठा गैरव्यवहार केला होता.

मराठवाड्यातील परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना या चार जिल्ह्यांबरोबरच इतर राज्यातीलही असंख्य शेतकऱ्यांची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. यानंतर आंध्रा बँक, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक आणि मुंबईची रत्नाकर बँक अशा पाच राष्ट्रीयकृत बँकाकडून तब्बल ३२८ कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेअर्स घेतले, त्याचबरोबर ऊस पुरवला, त्याबाबत बँकांनी शेतकऱ्यांना नोटीस पाठवली, तेव्हा हे प्रकरण उजेडात आले.

याप्रकरणी रत्नाकर गुट्टे यांच्यावर ५ जुलै २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात दोन वर्षानंतर कारवाईला सुरुवात झाली. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी कारखान्याचे मुख्य कृषी अधिकारी नंदकुमार शर्मा, ऊस पुरवठा अधिकारी तुळशीदास अंभोरे, ऊस विकास अधिकारी बच्चूसिंह पडवळ यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर औरंगाबाद सीआयडीच्या पोलीस अधीक्षक लता फड, डीवायएसपी पठाण यांच्या पथकाने रत्नाकर गुट्टे यांना गंगाखेड मधून अटक करुन गंगाखेड कनिष्ठ न्यायालयात हजर केले. या प्रकरणाचे दोषरोप पत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर तब्बल ३४६ दिवस त्यांना त्यायालयीन कोठडीत राहावे लागले.

हेही वाचा -सीएए, एनआरसी विरोधात ठराव.. परभणीतील 'त्या' लोकप्रतिनिधीवर भाजपची कारवाई

दरम्यान, आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने गंगाखेड विधानसभा मतदार संघातून २०१९ ची विधानसभा निवडणुक लढवली. विशेष म्हणजे रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर हे गंगाखेडमध्ये ठाण मांडून होते. मात्र, यात गुट्टे यांचा विजय झाला. त्यांनी डॉ. मधुसुदन केंद्रे यांचा पराभव केला. मात्र, आमदार झाल्यानंतरही गुट्टे यांना जामीन मिळाला नव्हता. परंतू विधानसभेच्या सदस्य पदाची शपथ घेण्यासाठी ते पॅरोलवर बाहेर आले होते.

हेही वाचा -भाजपच्या ताब्यातील नगरपालिकांनीच संमत केला 'सीएए'-'एनआरसी' विरोधात ठराव

ABOUT THE AUTHOR

...view details