महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"राष्ट्रवादी"चे आमदार दुर्रानी यांना समर्थकांसमोर मारहाण, पाथरीत तणावाचे वातावरण - Maharashtra crime

या घटनेनंतर पाथरी (pathari crime) या शहरात तणाव पसरला होता. स्थानिक आमदाराला मारहाण झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. काही लोकांनी लगेच दुकाने बंद केली. पाथरीत शुकशुकाट पसरला. पण आमदार दुर्रानी (babajani durrani) यांनी पुढाकार घेऊन लोकांना दुकाने उघडण्यास सांगितली. तसेच समर्थकांना कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले

आमदार बाबाजानी दुर्रानी
आमदार बाबाजानी दुर्रानी

By

Published : Nov 19, 2021, 1:04 PM IST

Updated : Nov 19, 2021, 2:21 PM IST

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) जिल्हाध्यक्ष आणि विधान परिषद आमदार बाबाजानी दुर्रानी (babajani durrani) यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आमदार दुर्रानी यांनी एका युवकाविरुद्ध पोलिस तक्रार दिली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित युवकाला पोलिसांनी अटक केल्याचेही समजते.

परभणी जिल्ह्यातील पाथरी (pathari crime) या शहरातील कबरस्थान परिसरात आमदार बाबाजानी दुर्रानी समर्थकांसह काही कामानिमित्त आले होते. यावेळी मोहम्मद सईद या तरुणाने त्यांच्यासोबत वाद घातला. त्यावर दुर्राणी यांनीही उत्तरे दिली. वाद इतका विकोपाला गेला, की या तरुणाने खेट दुर्रानी यांना मारहाण करण्यास सुरवात केली. हे बघून त्यांच्या समर्थकांना धक्का बसला. त्यांनी या तरुणाला मारहाण केली.

या घटनेनंतर पाथरी या शहरात तणाव पसरला होता. स्थानिक आमदाराला मारहाण झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. काही लोकांनी लगेच दुकाने बंद केली. पाथरीत शुकशुकाट पसरला. पण आमदार दुर्रानी यांनी पुढाकार घेऊन लोकांना दुकाने उघडण्यास सांगितली. तसेच समर्थकांना कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले.

Last Updated : Nov 19, 2021, 2:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details