महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हवामान खात्यावर शेतकरी संतप्त, दाखल करणार 420 चा गुन्हा

यावर्षी 17 जूननंतर शेतकऱ्यांना पेरण्या करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले होते. हवामान खात्याने यावर्षी वर्तवलेला पावसाचा अंदाज सपशेल खोटा ठरला आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या विरोधात आपण फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहोत, अशी माहिती माणिक कदम यांनी दिली आहे.

माणिक कदम
माणिक कदम

By

Published : Jun 27, 2021, 6:45 PM IST

परभणी - हवामान खात्याने यावर्षी वर्तवलेला पावसाचा अंदाज सपशेल खोटा ठरला आहे. 17 जूननंतर शेतकऱ्यांना पेरण्या करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र, पाऊस गायब झाल्याने, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. या परिस्थितीला हवामान खाते जबाबदार आहे. 2017 प्रमाणे यावेळीही हवामान खात्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार असल्याची, माहिती माणिक कदम यांनी दिली आहे. कदम हे 'मी शेतकरी आत्महत्या करणार नाही' या अभियानाचे प्रमुख आहेत.

हवामान खात्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूल याबाबत आपण तक्रार करणार असल्याची माहिती देताना माणिक कदम

'95 ते 100 टक्के पावसाचा अंदाज'

यावर्षी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पाऊस पडल्याने, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. तसेच, हवामान खात्यानेही यावर्षी 95 ते 100 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. जून महिन्यात चांगल्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली होती. त्यानुसार कृषी विभागाने 17 जूनपर्यंत पेरण्या करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. मात्र, पाऊस दडी मारून बसला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जूनच्या सुरुवातीला पाऊस चांगला पडला. मात्र, गेल्या आठवड्यापासू पाऊस गायब झाल्याची परिस्थिती आहे. सध्याच्या परिस्थितीत बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या आहेत. आता हे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना पावसाने मात्र दडी मारली आहे.

'2017 मध्येही केला होता गुन्हा दाखल'

2017 मध्येही हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस पडलाच नाही. त्यावेळीही हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरल्याने कदम यांनी हवामान खात्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. आता यावेळीही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी त्यांच्या भूलथापांना बळी पडले, शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी हवामान खात्याच्या विरोधात आपण फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहोत, अशी माहिती त्यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details