परभणी- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या शाळा कधी सुरू कराव्यात आणि त्या कशा पद्धतीने त्या चालू राहतील, यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील विविध आमदार तसेच शिक्षणतज्ञांशी चर्चा केली. झुम अॅपच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत मराठवाड्यातून जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शाळेसंदर्भात त्यांचे मत जाणून घेऊन त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मंत्री गायकवाड यांनी बोर्डीकर यांना दिले आहे.
शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची आमदार मेघना बोर्डीकरांशी चर्चा - वर्षा गायकवाड आमदार मेघना बोर्डीकर बातमी
शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांनी आज शनिवारी महाराष्ट्रातील निवडक काही आमदारांसह माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार व शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत झूम अँप च्या माध्यमातून संपर्क साधला.
शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांनी आज शनिवारी महाराष्ट्रातील निवडक काही आमदारांसह माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार व शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत झूम अँप च्या माध्यमातून संपर्क साधला. महाराष्ट्रातील शाळा कधी सुरू कराव्यात व कशा पद्धतीने सुरू कराव्यात, यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिक्षण क्षेत्रातील काही तज्ञ, मंत्री आणि आमदारांना आमंत्रित करून कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यासाठी व त्यावरील उपाययोजना करण्यासाठी चर्चा केली. यात मराठवाड्यातून आमदार बोर्डीकर यांना आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी बोर्डीकर यांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कशा पद्धतीने मदत होईल. शाळा कशा सुरू करता येतील, याबद्दल आपले मत व्यक्त केले. त्यांनी ग्रामीण भागातील परिस्थिती मांडली. 15 जुनपर्यंत पुस्तके घरपोच वाटप करावीत, ही मागणी केली. जि. प. शाळेतील भौतिक सुविधांचा अभाव व सोशल-डिस्टन्सिंग, स्वच्छता राखली गेली पाहिजे. 30 जूननंतर कोरोनाची परिस्थिती बघूनच शाळा चालू करण्याचा निर्णय घेण्यात यावा. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही. तसेच शाळा सुरू करण्यासाठी करावी लागणारी कसरत देखील त्यांनी मांडली.