महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑक्सिजन टँकर पळवापळवीच्या चर्चेत फारसे तथ्य नाही - राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून ओझन निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सीजनचा वापर होतो. त्या ऑक्सीजनचे प्रमाण कमी करीत आरोग्यासाठीच ते ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात कसे वापरता येईल, या दृष्टीने राज्य सरकारद्वारे सर्वार्थाने प्रयत्न सुरू आहेत. औद्योगिक वापरासाठी ऑक्सीजन वापरावर पूर्णतः निर्बंध घालण्यात आले आहेत, असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले.

मंत्री प्राजक्त तनपूरे
मंत्री प्राजक्त तनपूरे

By

Published : Apr 24, 2021, 9:23 PM IST

Updated : Apr 24, 2021, 10:22 PM IST

परभणी- 'कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांवर मोठा ताण आला आहे. मात्र, ऑक्सिजन टँकरची पळवापळवी होत असल्याची जी चर्चा आहे, त्यात फारसे तथ्य नाही, असा दावा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला. तसेच जिल्ह्याचा जो वाटा असेल तो त्या प्रमाणात मिळेल, असे ते म्हणाले. याशिवाय राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील ओझोन निर्मितीसाठी लागणारे ऑक्सीजन आरोग्यासाठी वापरण्याचे प्रयत्न राज्य सरकारद्वारे सुरू आहेत, अशी देखील माहिती तनपुरे यांनी दिली.

बोलताना राज्यमंत्री तनपुरे

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज (शनिवारी) संध्याकाळी आयोजित पत्रकार परिषदेत तनपुरे बोलत होते. यावेळी आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, सीईओ शिवानंद टाकसाळे, आयुक्त देविदास पवार, राजेश विटेकर, किरण सोनटक्के, संतोष देशमुख आदी उपस्थित होते.

ओझन निर्मितीसाठी लागणारे ऑक्सीजन आरोग्यासाठी

राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून ओझन निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सीजनचा वापर होतो. त्या ऑक्सीजनचे प्रमाण कमी करीत आरोग्यासाठीच ते ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात कसे वापरता येईल, या दृष्टीने राज्य सरकारद्वारे सर्वार्थाने प्रयत्न सुरू आहेत. औद्योगिक वापरासाठी ऑक्सीजन वापरावर पूर्णतः निर्बंध घालण्यात आले आहेत, असेही तनपुरे यांनी स्पष्ट केले.

परभणीचा प्लांट एका आठवड्यात कार्यान्वित होणार

दरम्यान, परभणीतील जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतील ऑक्सीजन प्लांट्स उभारणीत काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्या अडचणी दूर करण्याचे सर्वार्थाने प्रयत्न सुरू आहेत. एका आठवड्यात तो प्लांट कार्यान्वित होईल व त्याद्वारे दररोज 300 सिलेंडर उपलब्ध होतील, असे ते म्हणाले. परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून अंबाजोगाई व परभणीत हे दोन ऑक्सीजन प्लांट वळविण्यात आले आहेत. अंबेजोगाई येथील काम अंतिम टप्पयात आहे. एक दोन दिवसात तो प्लांट कार्यान्वित होईल. परभणीतील प्लांटसाठी मोठे कॉम्प्रेसर लागणार असून ते सेकंडहॅन्ड का असेना पण त्यासाठी कॉम्प्रेसर मिळावेत, या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे तनपुरे म्हणाले.

परभणीचे टँकर अन्य जिल्ह्यात वळवण्याचा प्रकार

गेल्या सलग 3 दिवसांपासून परभणीत येणारे ऑक्सिजनचे टॅंकर अन्य जिल्ह्यांनी पळवल्याची चर्चा आहे. सुरूवातीला परभणीत येणारा लिक्विड ऑक्सिजनचा टँकर लातूर येथे वळविण्यात आला. त्यानंतर बीड आणि आज (शनिवारी) परभणीत येणारा ऑक्‍सिजनचा टँकर जालन्यात वळविण्याचा प्रकार घडल्याचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी यावेळी मंत्री तनपुरे यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, याबाबत चर्चा होत असताना राज्यमंत्री तनपुरे यांनी 'या चर्चेत तथ्य नसल्याचे सांगितले. संबंधित खात्याकडून प्रत्येक जिल्ह्याला कोठा निश्चित केला आहे. त्याप्रमाणे त्या जिल्ह्याला टँकर उपलब्ध केल्या जात असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा -धक्कादायक, कोरोनामुळे परभणीचे जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे निधन

Last Updated : Apr 24, 2021, 10:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details