महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..तर मंत्र्यांच्या कार्यक्रमांना एकही खुर्ची देणार नाही'; परभणीत मंडप डिलर्सचे धरणे आंदोलन - mandap And decoration dealers

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर आठ महिन्यांपासून कार्यक्रम, इव्हेंटवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मंडप व्यावसायिक अडचणीत आले आहेत. आता या व्यावसायिकांना त्यांचे व्यावसाय सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी करत मंडप मंडप डिलर्स असोसिएशनने आज (सोमवारी) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन सुरू केले.

mandap material suppliers
कार्यक्रमांना एकही खुर्ची देणार नाही

By

Published : Nov 2, 2020, 3:02 PM IST

परभणी- कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारद्वारे गेल्या आठ महिन्यांपासून विविध कार्यावर, इव्हेंटवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधाच्या निषेधार्थ परभणीत जिल्हा मंडप डिलर्स असोसिएशनने आज (सोमवारी) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी घोषणाबाजी करतपूर्ण क्षमतेने मंगल कार्यालये तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच यावेळी मागण्या मान्य न झाल्यास मंत्र्यांच्या कार्यक्रमांना एकही खुर्ची देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

कार्यक्रमांना एकही खुर्ची देणार नाही
आमचेच व्यवसाय बंद का ?'अनलॉक' ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्यातील बहुतांश व्यवहार हे सुरळीत होत आहेत. सरकार आणि प्रशासनाद्वारे टप्पाटप्प्याने निर्बंध उठवले जात आहेत. परंतू आनंद घडवून आणणाऱ्यांच घरीच आज नैराश्याचे वातावरण आहे. सगळे व्यवसाय सुुरळीत झाले. मग आमचेच व्यवसाय बंद का ? असा सवाल या आंदोलनकर्त्यांनी केला. तर 'मंत्र्यांच्या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्ते जमत आहेत. शासनाचे मोठे-मोठे कार्यक्रम होत असताना लग्न आणि समारंभांना 50 लोकांचीच अट घातल्या जात आहे. त्यामुळे वाजंत्री पासून फोटोग्राफर पर्यंत सर्वांचेच व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, शासनाने तात्काळ हे निर्बंध उठवण्याची आदेश दिले पाहिजेत. अन्यथा यापुढे मंत्र्यांच्या एकाही कार्यक्रमांना खुर्ची देणार नाही किंवा कोणत्या समारंभांना चमच्या सुद्धा देणार नसल्याचा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष शेख इफतेखार यांनी दिला. 'काळे कपडे घालून केला निषेध'राज्य सरकारच्या या धोरणा विरोधात असोसिएशनने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात हे धरणे आंदोलन केले. यामध्ये मोठ्या संख्येने मंडप, डेकोरेशन, लाईट्स्, केटरर्स आदी क्षेत्रातील मंडळी सहभागी झाली आहे. यातील काही आंदोलनकर्त्यांनी काळे शर्टस्, काळ्या पॅन्ट घालून निषेध केला.

ABOUT THE AUTHOR

...view details