महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्नीच्या मृत्यूमुळे नैराश्य... व्हाट्सअॅप वर 'स्टेटस' ठेवून पतीची आत्महत्या - गंगाखेड पोलीस ठाणे बातमी

पत्नीच्या अपघाती मृत्यूमुळे नैराश्येत गेलेल्या सार्थक बचाटे नामक तरुणाने सोमवारी सकाळी व्हाट्सअ‌ॅपवर आपल्या मृत्यूचे स्टेटस ठेवत आत्महत्या केली.

तो पत्नीला भेटायला देवाघरी गेला, व्हाट्सअ‌ॅपवर 'स्टेटस' ठेवून केली आत्महत्या
तो पत्नीला भेटायला देवाघरी गेला, व्हाट्सअ‌ॅपवर 'स्टेटस' ठेवून केली आत्महत्या

By

Published : Mar 11, 2020, 4:46 PM IST

परभणी - अपघातात पत्नीच्या मृत्यूमुळे नैराश्यात गेलेल्या तरुणाने सोमवारी सकाळी आत्महत्या केली. तत्पूर्वी, त्याने तसे व्हाट्सअपवर स्टेटस ठेवले होते. तसेच 'माझ्या मरणाला कोणीही जबाबदार नाही, आई-पप्पा मी जातोय' आणि मित्रांसाठी त्याने 'भावांनो मी आज तुम्हाला सोडून जातोय', अशी भावनिक पोस्ट टाकून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गंगाखेड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वडगाव स्टेशन या ठिकाणी घडली आहे. सार्थक संजय बचाटे (२४, रा.वडगाव स्टेशन, ता. सोनपेठ) असे या तरुणाचे नाव आहे.

तो पत्नीला भेटायला देवाघरी गेला, व्हाट्सअ‌ॅपवर 'स्टेटस' ठेवून केली आत्महत्या

सार्थकने सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गावाशेजारील शेतात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, गंगाखेड येथे सर्व्हिसिंग सेंटर चालवणाऱ्या सार्थक बचाटे यांचा ११ फेब्रुवारीला गंगाखेड-परळी रोडवर अपघात झाला होता. त्यात पत्नी चंदा यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ते नैराश्यात होते. त्यातूनच सोमवारी सकाळी त्यांनी आपल्या व्हाट्सअ‌ॅपच्या स्टेटसवर पत्नीला उद्देशून ‘मी तुला भेटायला येत आहे’ तसेच आपल्या परिवारासह मित्रांनाही उद्देशून स्टेटस ठेवले होते. त्याच्या मित्रांनी व नातेवाइकांनी हे स्टेटस पाहिल्यानंतर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, तो घराच्या पाठीमागील एका शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सार्थकच्या या चुकीच्या निर्णयामुळे वडगावात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा -कचऱ्याची होळी करत महिलांनी दिला 'स्वच्छता आणि बेटी बचाव' चा संदेश

सार्थकने आत्महत्या करण्यापूर्वी अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीला उद्देशून व्हाट्सअ‌ॅपवर स्टेटस ठेवले होते. ज्यामध्ये त्याने ‘मी तुला भेटायला यायलो’ असे लिहिले. तर, दुसऱ्या एका स्टेटसमध्ये त्याने आपल्या आई-वडिलांसह बहीण व भावजी यांची माफी मागितली. तिसऱ्या स्टेटसमध्ये आपल्या मित्रांना उद्देशून अखेरचा निरोप घेतला. त्यात त्याने ‘भावांनो, तुम्हाला सोडून आज मी जायलो’ असे लिहले आहे. याप्रमाणेच आणखी एका स्टेटसमध्ये त्याने 'आपल्या मरणाला कोणालाही जबाबदार धरू नये', असे स्पष्ट केले आहे. पत्नीच्या निधनामूळे नैराश्यात आलेल्या सार्थकने महिनाभराच्या आतच हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा -'वादळी वाऱ्यासह पाऊस आला अन् गहू, ज्वारीसाठी केलेला खर्च क्षणार्धात मातीत गेला'

ABOUT THE AUTHOR

...view details