महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामुक्त गाव: मुख्यमंत्र्यांनी साधला खादगावच्या सरपंच सावित्री फड यांच्याशी संवाद - uddhav thackeray communicate with Savitri Phad

कोरोनातून गावाला सुरक्षित ठेवत राज्यातील विविध ग्रामपंचायतींनी आपआपल्या गावात अनेक अभिनव प्रयोग राबविले, अशा अभिनव प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील प्रातिनिधिक ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवारी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्स
मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्स

By

Published : Jun 11, 2021, 9:18 PM IST

परभणी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील खादगावाने आपला वेगळा पायंडा निर्माण केला. या गावाने साध्य केलेल्या या यशाची माहिती प्रत्यक्ष सरपंचाकडून व्हावी, या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खादगावच्या सरपंच सावित्रीबाई राजेश फड यांच्याशी संवाद साधला.

'कोरोनामुक्त गाव' या स्पर्धेच्या निमित्ताने आता या संकल्पनेला लोकाभिमुख चळवळीचे स्वरुप प्राप्त होत आहे. राज्यातील असंख्य ग्रामपंचायतींनी सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातही अभूतपूर्व काम करुन अभिनव संकल्पना राबविल्या आहेत. कोरोनातून गावाला सुरक्षित ठेवत राज्यातील विविध ग्रामपंचायतींनी आपआपल्या गावात अनेक अभिनव प्रयोग राबविले, अशा अभिनव प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील प्रातिनिधिक ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवारी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

'शेत, शिवाराच्या लळ्यातून गावात विलगीकरण - सावित्री फड'

खादगावच्या सरपंच सावित्रीबाई फड म्हणाल्या, की आपले गाव आदर्श गाव ठरावे, या उद्देशाने खादगाव ग्रामपंचायतीच्यावतीने पाणलोटापासून आजवर विविध चळवळी व उपक्रम राबविले. माथा ते पायथा या जलसंधारणाच्या उपचारामुळे गावामध्ये बऱ्यापैकी पाणी निर्माण झाले. ही सर्व कामे लोकसहभागातून साध्य झाल्याने कोरोनाच्या बाबतही गावकऱ्यांनी सामुहिक जबाबदारीचे भान जपले. कोरोनाच्या काळात बहुसंख्य शेतकरी हे आपल्या शेतावर व्यस्त असल्यामुळे एक प्रकारे ते विलगीकरणच ठरले. यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी इतर उपाययोजना चोखपणे राबविता आल्याची माहिती सरपंच सावित्री फड यांनी दिली. गावात आदर्श शाळा, रानटी बाभळी मुक्त गाव आणि प्रत्येक घराला पिण्यासाठी मोफत आरओचे पाणी अशी समृद्धी सजग लोकसहभागामुळे गावाला भेटल्याचे सरपंच फड यांनी सांगितले.

हेही वाचा-प्रशांत किशोर आणि शरद पवार 'सिल्वर ओक'वर भेट; दोघांमध्ये तीन तास चर्चा

ग्रामस्थांनी नवीन मापदंड निर्माण केला - मुख्यमंत्री ठाकरे

'एरवी शहर आणि महानगरात मर्यादित असलेल्या व्हॉटस्ॲपसारख्या सोशल मीडियाचा उपयोग आपल्या खेड्यात कोरोना येऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी करून यातही नवीन मापदंड निर्माण केला, या शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरपंच आणि ग्रामस्थांचा गौरव केला.

हेही वाचा-आम्ही वित्तीय बाबतीत तज्ज्ञ नाही- सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली कर्जफेड मुदतवाढीची याचिका

'ज्या गावांत कोरोना आटोक्यात तेथेच सवलत' -

सुमारे 2 तास चाललेल्या या संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावधान राहण्याचा सल्ला दिला. राज्यातील लॉकडाऊन अजून उठलेले नाही, तर ज्या-ज्या गावांमध्ये कोरोनाचे प्रमाण अटोक्यात आले आहे, अशा गावांमध्ये विविध स्तरावर वर्गवारी करून सवलत दिली असल्याचे स्पष्ट केले. राज्यात लसीकरणाचा तुटवटा जरी असला तरी ज्या प्रमाणात लसीची उपलब्धता होत आहे. त्यानुसार लसीकरण मोहिम ग्रामीण भागापर्यंत सक्षम चालावी याची खबरदारी आरोग्य विभागातर्फे घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावातील लोकसंख्या लक्षात घेऊन गल्लीनिहाय, लोकसंख्यानिहाय टिम तयार करुन टिममधील सदस्यांनी वेळोवेळी जागरुकतेची भूमिका घेतली तर अशा भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. आरोग्याच्या सुविधा ग्रामपातळीपर्यंत उपलब्ध होण्यासाठी विविध सुविधा शासन पुरवित आहे. तथापि या सुविधांची अत्यावश्यकता पडू नये, याची काळजी ग्रामस्थांनी घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले.


हेही वाचा-..ही तर ठरवून केलेली रणनीती; योगी विरुद्ध मोदी प्रकरणावर नवाब मलिकांची प्रतिक्रिया
ग्रामविकास मंत्र्यांकडून गावे कोरोनामुक्त करण्याचा विश्वास -

कोरोनामुक्त गाव स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील गावे कोरोनामुक्त करू, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी 14 व्या आणि 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून कोरोना प्रतिबंधात्मक सुविधांसाठी ग्रामपंचायतींना मोठ्याप्रमाणात निधी दिल्याची माहिती दिली. कोरोना मुक्त गावाची स्पर्धा ही स्पर्धा न रहाता लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.


कोरोनामुक्त गावाची संकल्पना लोकमनात रुजवली -

गावखेड्याचा आढावा घेऊन कोरानामुक्त गावाची संकल्पना मुख्यमंत्र्यांनी लोकमनात रुजवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करून राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, यासाठी राज्यातील गावे खूप नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. माझे कुटुंब- माझी जबाबदारी अभियानातील जबाबदारी ओळखून गावे आपल्या गाव कुटुंबाची काळजी घेत आहेत. यावेळी टास्कफोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक आणि पोपटराव पवार यांनी ही मार्गदर्शन केले.

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पद्मश्री पोपटराव पवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब ज-हाड यांच्यासह राज्य टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ.संजय ओक, डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details