परभणी- युतीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांनी आघाडीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा परभणीत ४२ हजार ३९९ मतांनी विजय संपादन केला आहे. संजय जाधव समर्थकांनी विजयानंतर एकच जल्लोष केला आहे.
Live updates -
- ७.३५ - संजय जाधव ४२ हजार ३९९ मतांनी विजयी
- ६.३० - युतीचे विद्यमान शिवसेनेचे संजय जाधव विजयी घोषित
- १.५३ - संजय जाधव - २५४७५ आघाडीवर
- १२.१७ - संजय जाधव २९०४६ मतांनी आघाडीवर
⦁ शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांना ४१ हजार ९४८ मते
⦁ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांना ३१ हजार ९०९ मते
⦁ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना ९ हजार ५१३ मते मिळाली आहेत.
⦁ शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यापेक्षा १० हजार २३९ मतांनी आघाडीवर आहेत.
- १०.५१ - तिसऱ्या फेरीअखेर संजय जाधव यांची १० हजार मतांनी आघाडी
- शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव हे ६२२५ मतांनी आघाडीवर
- थोड्याच वेळापूर्वी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव हे आघाडीवर आहे.
- आज सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
मतमोजणी ठिकाण
वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी