परभणी - परभणी पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. 29 मार्च) पाथरीच्या सेलू कॉर्नर परिसरातील एका गोडाऊनमधून तब्बल 4 लाख 80 हजार रुपयांचा गुटका जप्त केला आहे. तसेच एकाला अटक देखील करण्यात आली आहे.
गुप्त माहितीवरून टाकला अचानक छापा
दरम्यान, ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना, अतिरीक्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना दिली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (सोमवारी) मिळालेल्या माहितीच्या आधारे सेलू कॉर्नर परिसरात असलेल्या गोदामावर अचानक छापा टाकला. त्यावेळी तेथे शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा साठा पोत्यात भरून ठेवल्याचे निदर्शनास आले. पथकाने सर्व साठा जप्त करत गुटख्यची मोजदाद केली. यात तब्बल 4 लाख 80 हजार 240 रुपयांचा गुटखा मिळून आला. या पथकाने मुद्देमालासह अवेस खान या आरोपीला अटक केली. या प्रकारणी पाथरी पोलीस ठाण्यात अन्य तीन संशयितांवर गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा -बोला आता... पोलिसानेच दिला पत्नीला तीन तलाक; 'एमपीएससी'साठी 10 लाख रुपये आणण्याचा तगादा