महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत मंगळवारी 844 कोरोनाबाधित; 20 रुग्णांचा मृत्यू - Parbhani corona news

जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटल्ससह खासगी मंगल कार्यालय आणि इतर इमारतीमधून 30 कोरोना हॉस्पिटल सुरू आहे. या रुग्णालयांमध्ये 1 हजार 839 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी सध्या केवळ 275 बेड रिकामे आहेत. तर 1530 रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय 6 हजार 340 रुग्ण घरून (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत.

परभणी रुग्णालय
परभणी रुग्णालय

By

Published : May 4, 2021, 10:00 PM IST

परभणी - एकीकडे महाराष्ट्रातील मोठमोठ्या जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या घटत असताना परभणी जिल्ह्यात मात्र, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज मंगळवारी गेल्या 24 तासात 844 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 20 रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 943 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर 7893 बधितांवर उपचार सुरू आहे.

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असून मंगळवारी 844 नवीन बाधित आढळले. तर 20 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 7 हजार 893 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत 948 करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 40 हजार 17 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 31 हजार 176 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 54 हजार 49 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 13 हजार 956 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 40 हजार 17 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले.

जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक बधितांचे मृत्यू

दरम्यान गेल्या 24 तासात 20 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यात 15 पुरुष तर 5 महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक मृत्यू (14) जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय इमारतीमधील कोरोना हॉस्पिटलमध्ये झाले. याशिवाय सिद्धिविनायक 2 तर अनन्या, प्राईम, सामले, स्पर्श या खासगी हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी 1 अशा 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात 275 बेड शिल्लक

दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटल्ससह खासगी मंगल कार्यालय आणि इतर इमारतीमधून 30 कोरोना हॉस्पिटल सुरू आहे. या रुग्णालयांमध्ये 1 हजार 839 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी सध्या केवळ 275 बेड रिकामे आहेत. तर 1530 रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय 6 हजार 340 रुग्ण घरून (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत. तर रेणुका हॉस्पिटल येथे 52 बेड रिकामे असून, जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय हॉस्पिटल मध्ये 43 बेड तर जिल्हा रुग्णालयात 2, जिल्हा परिषद कोरोना हॉस्पिटल 53, परभणी आयसीयू 2, स्वाती 8, पाडेला 4, भारत हॉस्पिटल 6, डॉ. प्रफुल पाटील हॉस्पिटल 24, देशमुख 3, अक्षदा मंगल कार्यालय 13, प्राइम 4, मोरे 3, सामले 2, सिद्धिविनायक 3, ह्यात 10, सुरवसे मॅटर्निटी 3, देहरक्षा 13, स्पर्श हॉस्पिटल 11, तर गोकुळ हॉस्पिटलमध्ये 10 बेड शिल्लक आहेत. त्यामुळे नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांनी बेड शिल्लक नसल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता या रुग्णालयांमध्ये संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details