परभणी -जिल्ह्यातील पूर्णा-चुडावा या मार्गावर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या वाहनाचा जोरदार अपघात झाला. या अपघातात प्रभारी उपविभागीय अधिकारी सुभाष राठोड जखमी झाले आहेत. रस्त्यावर दिशादर्शक नसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप करत राठोड यांनी या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, सुभाष राठोड यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत.
हेही वाचा -परभणीत ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू; हलगर्जी करणारे अधिकारी फैलावर