परभणी - जिल्ह्यात आज (मंगळवारी) तब्बल 1 हजार 211 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 18 रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 842 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, आज आढळलेली रुग्णसंख्या ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण्संख्या आहे.
5 हजार 905 कोरोनाबाधित रुग्ण उपचार -
सद्य परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांमधून तब्बल 5 हजार 905 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत 689 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत 27 हजार 298 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले आहेत. त्यापैकी 20 हजार 704 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 16 हजार 402 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 88 हजार 325 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 27 हजार 150 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, 787 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले आहेत.
2 दिवस परिस्थितीत झाली होती सुधारणा -