महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणी जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन; पालमच्या लेंडी नदीला पूर - पोळा आणि पाऊस झाला भोळा

मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा जिल्ह्यात हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसात जिल्ह्यात ६० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.

पालमच्या लेंडी नदीला पूर; नदीकाठच्या 12 गावांचा संपर्क तुटला

By

Published : Sep 1, 2019, 4:44 PM IST

परभणी - गेल्या 22 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा जिल्ह्यात हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसात जिल्ह्यात ६० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
पूर्णा-पालम या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पालम शहराजवळून वाहणाऱ्या लेंडी नदीला पूर आला आहे. परिणामी नदीकाठच्या 12 गावांचा संपर्क तुटला आहे. पालम शहराच्या वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे.

पालमच्या लेंडी नदीला पूर; नदीकाठच्या 12 गावांचा संपर्क तुटला

हेही वाचा -पोळ्याच्या दिवशी बिथरलेल्या बैलाने घेतला शेतकऱ्याचा जीव, परभणी जिल्ह्यातील घटना


या मोसमात यापूर्वी जास्तीत-जास्त 30 मिलिमीटर पावसाची नोंद एका दिवसात झाली होती. मात्र, शुक्रवारी 40.70 मिलिमीटर तर शनिवारी 20 मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे परभणीकरांना दिलासा मिळाला आहे.
अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या होत्या. जायकवाडी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले असले, तरी इतर भागात मात्र पाण्याची नितांत आवश्यकता होती. जनावरांच्या आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र, 'पोळा आणि पाऊस झाला भोळा' या म्हणीप्रमाणे पावसाने पोळ्याच्या दिवशीच परभणीत हजेरी लावली.

ABOUT THE AUTHOR

...view details