महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणी जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा फटका; घरावरील पत्रे उडाल्याने ११ जण जखमी - परभणी

पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव आणि धनगर टाकळी येथे रात्री साडेआठ वाजता झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात घरावरील पत्रे उडून गेली. विद्युत खांब वाकले, तर काही उन्मळून पडले. त्यामुळे अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. शिवाय झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत.

जखमींवर उपचार सुरू

By

Published : Jun 4, 2019, 10:33 AM IST

परभणी- जिल्ह्यातील पूर्णा आणि पालम तालुक्यात सोमवारी रात्री ८ ते १० वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पूर्णामधील पिंपळगाव आणि धनगर टाकळी येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. परिणामी घरावर ठेवलेली दगड लोकांच्या अंगावर पडून ११ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव आणि धनगर टाकळी येथे रात्री साडेआठ वाजता झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात घरावरील पत्रे उडून गेली. विद्युत खांब वाकले, तर काही उन्मळून पडले. त्यामुळे अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. शिवाय झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. पिंपळगाव येथील एका घरातील पत्र्यावर ठेवलेले दगड पडून ३ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. मिनाबाई गणपत सूर्यवंशी (वय ४८), सावीत्रीबाई गणपत सुर्यवंशी (४०), सुमन वैजनाथ रेंगडे (६० ) असे जखमींचे नावे आहेत. त्यांना नांदेड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

पिंपळगाव येथील सरस्वती कुंडलीक बनसोडे (वय ४५), गंगूबाई वामनराव बनसोडे (६०), कुंडलीक माणीकराव बनसोडे (६२), सुदर्शन गंगाधर खारोडे (७), शुभम कुंडलीक बनसोडे (११), देवराव नारायण बनसोडे (३०) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पूर्णा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच पिंपळगाव येथील जनावरे देखील मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. या प्रमाणेच धनगर टाकळी येथील श्यामराव आनेराव माठे (५५), तर खांबेगाव येथील खंडू पांडोजी चावरे (६५) हे देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पूर्णेतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली. तसेच तहसीलदार आणि महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते.

या वादळी वाऱ्यानंतर पालम तालुक्यातील काही गावात तसेच शहरात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. वाऱ्यामुळे शहरातील अनेक होर्डींग्ज जमीनदोस्त झाले आहेत. पावसामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details