परभणी - शहरात पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. 26 डिसेंबरला मध्यरात्री पडलेल्या पावसानंतर आज (मंगळवारी) पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे.
परभणीत पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात , रब्बी पिकांचे मोठे नुकसान - परभणीत मुसळधार पाऊस
अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतातील ज्वारी, गहू आणि फळपिकांची नासधूस होत आहे.
परभणीत पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पाऊस
या अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतातील ज्वारी, गहू आणि फळपिकांची नासधूस होत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तसेच हा पाऊस रोगराईला आमंत्रण देणारा आहे. वातावरणातील अचानक बदलामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा -ईडी, सीबीआयची पीडा मागे लावणाऱ्यांना आमंत्रण... राजू शेट्टींनी व्यक्त केली नाराजी
Last Updated : Dec 31, 2019, 6:14 AM IST