महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत मोठ्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पाऊस; बळीराजा सुखावला

परभणी जिल्ह्यात ७७४.६२ मिलिमीटर पावसाची सरासरी नोंद आहे. परंतु, गेल्या काही वर्षात एकदाही पावसाने सरासरी गाठली नाही. प्रत्येक वेळी ५० ते ६० टक्के पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, परभणीसह पूर्णा, मानवत, सेलू, जिंतूर, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड आदी सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

परभणीत मोठ्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पाऊस

By

Published : Jul 26, 2019, 10:31 PM IST

परभणी -मोठ्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात आज (शुक्रवार) मुसळधार पाऊस झाला. पाणीच पाणी असे चित्र परभणीकरांना पाहायला मिळत आहे. पावसामुळे सामान्य नागरिकांसह बळीराजा सुखावला आहे.

परभणीत मोठ्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पाऊस

जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ३० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांची परिस्थिती अत्यंत नाजूक झाली होती. जमिनीतील ओलावा संपुष्टात आला होता. त्यातच गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यामुळे या तापमानात पिके करपून जाण्याची भिती व्यक्त होत होती. पावसाची नितांत गरज असतानाच आज दुपारी ४ वाजता परभणीत मुसळधार पावसाने हजेरी लावली. तत्पूर्वी १२ वाजल्यापासूनच प्रचंड ढग दाटून येत होते. वातावरणातील उकाडा वाढला होता. त्यामुळे १५ मिनिटे मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर पुन्हा सात वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. माना टाकलेल्या पिकांना यामुळे जीवदान मिळेल. विशेषतः जनावरांच्या पाण्यासाठी नदी, नाले आणि तळ्यांमध्ये काही प्रमाणात पाणी साचले आहे.

दरम्यान, परभणी जिल्ह्यात ७७४.६२ मिलिमीटर पावसाची सरासरी नोंद आहे. परंतु, गेल्या काही वर्षात एकदाही पावसाने सरासरी गाठली नाही. प्रत्येक वेळी ५० ते ६० टक्के पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी हीच परिस्थिती दिसून येत आहे. पावसाने सुरुवातीलाच हुलकावणी दिली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस पुन्हा दुसऱ्या आठवड्यात थांबला. त्यानंतर या पावसाने चार-चार दिवसाला एकदा आणि तीही रिमझिम अशी सुरुवात केली. परंतु, आज झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात पावसाचा अनुशेष भरून निघेल अशी शक्यता आहे. परभणीसह पूर्णा, मानवत, सेलू, जिंतूर, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड आदी सर्वच तालुक्यांमध्ये पडला असून रात्री उशिरापर्यंत पावसाची ही रिपरिप सुरूच होती.

ABOUT THE AUTHOR

...view details