महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rajesh Tope On Omicron : 'ओमायक्रॉन' घातक नाही, मात्र संसर्गाचा वेग प्रचंड - राजेश टोपे - Tope on Vacant Medical Post Marathwada

ओमायक्रोनचे महाराष्ट्रासह देशात पाच रुग्ण आढळले आहेत. हा व्हेरिएंट घातक ( Omicron Variant Maharashtra ) नसल्याने चिंता बाळगण्याची गरज नाही. ( Health Minister Rajesh Tope on Omicron Variant ) मात्र या संसर्गाचा वेग प्रचंड असून काळजी घेणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

rajesh tope on Omicron
rajesh tope on Omicron

By

Published : Dec 5, 2021, 6:51 PM IST

Updated : Dec 6, 2021, 1:46 PM IST

परभणी - दक्षिण आफ्रिका खंडामध्ये डेल्टा चा संसर्ग जाऊन त्याची जागा आता 'ओमायक्रॉन'ने (Omicron variant ) घेतली आहे. हा संसर्ग भारतात देखील आला असून महाराष्ट्रासह देशात याचे 5 रुग्ण आढळले आहेत. या संसर्गाचा वेग प्रचंड असून यापुढे देखील सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope on Omicron Variant ) यांनी म्हटले आहे.

परभणी शहरातील कौशल्या किडनी आणि सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त आज परभणीच्या दौऱ्यावर आलेले आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुपारनंतर राष्ट्रवादी भवन येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. तसेच माळी गल्ली येथील राष्ट्रवादीच्या शहर शाखेच्या वतीने पार पडलेल्या आरोग्य शिबिराला देखील त्यांनी उपस्थिती लावली. या सर्व कार्यक्रमानंतर ते (Health Minister Rajesh Tope ) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे माहिती देताना
ओमायक्रॉन घातक नाही; मात्र प्रसाराचा वेग अधिक -
यावेळी बोलताना टोपे (Health Minister Rajesh Tope ) म्हणाले, जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सर्व समस्या सोडवण्यात येतील. सामान्य माणसाला शुन्य शुल्कात अत्याधुनिक आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून आरोग्य सुविधांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे होते. तरी कोरोनाने माणसाला जीवनाचे महत्व कळाले आहे. नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron variant ) हा तेवढा घातक नाही. मात्र, त्याच्या प्रसाराचा वेग प्रचंड आहे. यासाठी कोव्हिड-19 च्या नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे झाले आहे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉक्टरांची सर्व पदे भरण्यात आली -
मराठवाड्यातील डॉक्टरांची सर्व पदे भरण्यात आली असून, येत्या काही महिन्यात मराठवाड्यातील सर्व तालुकास्तरावरील रुग्णालयात रुग्णांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे आश्वासन देखील मंत्री राजेश टोपे यांनी दिले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मेडिकल कॉलेजच्या कामाला सुरुवात -

परभणीत ईएसआयएसचे हॉस्पिटल आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून टोपे यांनी परभणीकरांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या मेडिकल कॉलेजसाठी औपचारिक ती सर्व प्रक्रिया झाल्याचे सांगितले. तसेच लवकरच मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे देखील त्यांनी सांगितले. याशिवाय सोनोग्राफी, एमआरआय आणि सिटीस्कॅनची सुविधा येणाऱ्या सहा महिन्यात तालुक्यातील सर्व रुग्णालयात उपलब्ध करुन दिली जाईल, असे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले.यावेळी खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार मेघना बोर्डीकर, जि.प.उपाध्यक्ष अजय चौधरी, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार मधुसूदन केंद्रे, प्रताप देशमुख, डॉ. मुंजाभाऊ धोंडगे, डॉ. परमेश्वर जाधव व डॉ. शितल जाधव, महापालिका आयुक्त देविदास पवार आदींची उपस्थिती होती.
Last Updated : Dec 6, 2021, 1:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details