महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत ७ वर्षीय नातवाचा खून; मारेकरी चुलत आजोबाला अटक - परभणी सेलू तालुका बातमी

सात वर्षीय बालकाच्या खुनाने गावकरीही संतप्त झाले आहेत. सेलू पोलिसांना घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर दिगांबर जाधव यास ताब्यात घेतले. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड हे करत आहे. दिगांबर जाधव हा अभिराज याचा चुलत आजोबा आहे. घटनेचे नेमके कारण अद्याप समजले नाही.

grandpa killed his grandson in chakhalthana village of selu taluka at parbhani district
सेलूच्या चिकलठाण्यात बालकाचा खून

By

Published : Oct 12, 2020, 9:29 PM IST

Updated : Oct 12, 2020, 9:44 PM IST

परभणी -सेलु तालुक्यातील चिकलठाणा येथे एका सात वर्षीय बालकाचा खून करण्यात आल्याची घटना आज (सोमवारी) सायंकाळी घडली. या प्रकरणात पोलिसांनी त्या बालकाच्या चुलत आजोबाला अटक केली आहे. अभिराज श्रीराम जाधव असे या 7 वर्षीय बालकाचे नाव आहे.

अभिराज हा घरासमोर खेळत होता. त्यावेळी डिगांबर जाधव (वय 56) या व्यक्तीने त्या बालकाचा अचानक गळा दाबण्यास सुरवात केली. अभिराज याच्या आईच्या तो प्रकार निदर्शनास आला. तेव्हा त्या धावुन आल्या व डिगांबर जाधव याच्या तावडीतून अभिराज याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डिगांबर जाधव याने त्याच्या हातातील विळ्याने अभिराज याच्या छातीवर व पोटावर वार केले. त्यामुळे गंभीर अवस्थेत अभिराज यास सेलूतील उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी दाखल केले. परंतु अभिराज यास वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले.

या अनपेक्षित प्रकाराने कुटूंबीय अक्षरशः हादरले आहेत. सात वर्षीय बालकाच्या खुनाने गावकरीही संतप्त झाले आहेत. सेलू पोलिसांना घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर दिगांबर जाधव यास ताब्यात घेतले. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड हे करत आहे. दिगांबर जाधव हा अभिराज याचा चुलत आजोबा आहे. घटनेचे नेमके कारण अद्याप समजले नाही. तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बोरगावकर यांनी दिली आहे.

Last Updated : Oct 12, 2020, 9:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details