महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सेलूच्या ताईचा असाही विक्रम; दहावीच्या प्रत्येक विषयात मिळवले 35 गुण

सेलू येथील रेणुका वाघे या विद्यार्थिनीने काठावर पास होत 'हम भी कुछ कम नही' हे दाखवून दिले आहे. रेणुका हिला सर्व विषयात 35 गुण मिळाले आहेत. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक पण होत आहे. रेणुकाच्या कुटुंबीयांनी औंक्षण करून तिला भरभरून आशीर्वाददेखील दिले.

सेलूच्या ताईचा असाही विक्रम; दहावीच्या प्रत्येक विषयात मिळवले 35 गुण
सेलूच्या ताईचा असाही विक्रम; दहावीच्या प्रत्येक विषयात मिळवले 35 गुण

By

Published : Aug 2, 2020, 1:28 PM IST

परभणी - यंदा दहावीच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवून रेकॉर्ड केले आहेत. तसेच रेकॉर्ड राज्यातील काही मुलांनी प्रत्येक विषयात 35 गुण मिळवून सुद्धा केले आहेत. यामध्ये परभणी जिल्ह्यातील सेलूच्या एका ताईने सुद्धा असाच रेकॉर्ड केला. तिनेदेखील प्रत्येक विषयात 35 गुण मिळवून एकूण पस्तीस टक्के गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 'एखादा जरी गुण कमी मिळाला असता, तर माझं वर्ष वाया गेलं असतं; मात्र यापुढे आता असं होणार नाही, मी मन लावून अभ्यास करणार' अशी भावना तिने यानिमित्ताने व्यक्त केली आहे.

सेलूच्या ताईचा असाही विक्रम; दहावीच्या प्रत्येक विषयात मिळवले 35 गुण

दहावीच्या परीक्षेत केवळ मुलंच नव्हे तर काठावर पास होण्यात मुलीदेखील बाजी मारत आहेत. सेलू येथील रेणुका वाघे या विद्यार्थिनीने काठावर पास होत 'हम भी कुछ कम नही' हे दाखवून दिले आहे. रेणुका हिला सर्व विषयात 35 गुण मिळाले आहेत. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक पण होत आहे. रेणुकाच्या कुटुंबीयांनी औंक्षण करून तिला भरभरून आशीर्वाददेखील दिले. शिवाय पेढे वाटून आनंद व्यक्त केला. मात्र, यासंदर्भात बोलताना रेणुका हिने यापुढे आणखी मेहनत करण्याची इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली, 'दहावीच्या परीक्षेत मला सर्व विषयात 35-35 गुण मिळाले आहेत. मी आता काठावर पास झाले. मात्र मला एखाद्या विषयात एक जरी गुण कमी मिळाला असता, तर माझे वर्ष वाया गेले असते. त्यामुळे आता यापुढे असे होणार नाही. मी मेहनत करणार आणि अभ्यास करूनच आणखी यश मिळवणार', अशी भावना तिने व्यक्त केली आहे.

सेलूच्या ताईचा असाही विक्रम; दहावीच्या प्रत्येक विषयात मिळवले 35 गुण

ABOUT THE AUTHOR

...view details