महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमधील व्हिरा फार्मा कंपनीत गॅस गळती; तब्बल ५ तासानंतर आगीवर नियंत्रण

अग्निशमन दलाकडे गॅस गळती प्रतिबंधक मास्क नसल्याकारणाने ही वायू गळती थांबवणे अग्निशमन दलासाठी अडचण निर्माण होत आहे.

पालघर येथील अल्याळी औद्योगिक क्षेत्रातील व्हिरा फार्मा कंपनीत गॅस गळती

By

Published : Jul 1, 2019, 12:06 PM IST

Updated : Jul 1, 2019, 4:59 PM IST

पालघर - जिल्ह्यातील अल्याळी औद्योगिक क्षेत्रातील व्हिरा फार्मा कंपनीत गॅस गळती होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. पालघर अग्निशमन दलाकडे गॅस गळती प्रतिबंधक मास्क नसल्याकारणाने ही वायू गळती थांबवणे अग्निशमन दलासाठी अडथळा निर्माण झाला होता. मात्र, थोड्या वेळात बोईसर एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तब्बल ५ तासानंतर आग आणि वायू गळतीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

पालघरमधील व्हिरा फार्मा कंपनीत गॅस गळती; आग विझवण्यास सुरुवात

पालघर परिसरात पाऊस जास्त झाल्यामुळे आज या कंपनीने फक्त २ कामगार उपस्थित होते. मात्र, गॅस गळती झाल्याचे लक्षात येताच ते कंपनीतून बाहेर पडले. सध्या आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते.

Last Updated : Jul 1, 2019, 4:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details