महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नात्याला काळिमा.. नराधम बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पूर्णा तालुक्यातील एका नराधमाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर सतत बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची खबर पोलिसांपर्यंत पोहचली होती, त्यानुसार घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पूर्णा पोलीस आज (मंगळवारी) घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या पीडितेने मुलीने आपली व्यथा पोलिसांना सांगितली. यानंतर नराधम बापाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली.

परभणीत बापानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By

Published : Sep 3, 2019, 11:36 PM IST

परभणी - पूर्णा तालुक्यातील एका विकृत प्रवृत्तीच्या बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर सतत बलात्कार केल्याची नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. याबाबत पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधित नराधम आरोपी बापास पोलीसांनी अटक केली आहे.

हेही वाचा -पुण्यात अपहरण करून महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार; गुन्हा दाखल

पूर्णा तालुक्यातील एका नराधमाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर सतत बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची खबर पोलिसांपर्यंत पोहचली होती, त्यानुसार घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पूर्णा पोलीस आज (मंगळवारी) घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या पीडितेने मुलीने आपली व्यथा पोलिसांना सांगितली. यानंतर नराधम बापाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली.

हेही वाचा - चुनाभट्टी बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

या तक्रारीवरून पोलीसांनी नराधमास त्वरीत अटक केली. नात्याला कलंक फासणाऱया या नराधमाची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास पूर्णा पोलीस करत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमधून प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details