महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलाच्या विरहात पित्याने केली आत्महत्या; परभणी येथील घटना - father commits suicide in childlessness

काही दिवसांपूर्वीच मुलाचा झालेला विरह सहन न झाल्याने पित्याने स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे.

father commits suicide in childlessness in parbhani
मुलाच्या विरहात पित्याने केली आत्महत्या; परभणी येथील घटना

By

Published : Dec 4, 2020, 9:43 PM IST

परभणी -जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथे मुलाच्या मृत्युमुळे नैराश्य आलेल्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काही दिवसांपूर्वीच मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. मात्र, मुलाच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलून स्वतःची जीवनयात्रा संपवली. संजय तुकाराम घोळवे (42) असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथील रहिवासी असलेले संजय घोळवे हे मागील काही दिवसांपासून मुलगा विहिरीत बुडून मृत्यू पावल्यामुळे प्रचंड नैराश्यात होते. त्यातूनच त्यांनी काल (गुरुवारी) आसेगाव येथील शेतातील एका लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज दुपारच्या सुमारास उघडकीस आला.

पोलीसांनी केली अकस्मात मृत्यूची नोंद -

या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर जिंतूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या प्रकरणात जिंतूर पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

हेही वाचा - कंगना रणौतला कायदेशीर नोटीस, अभद्र ट्विटवर माफी मागण्याची शीख संस्थेने केली मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details