महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा कहर : शेतकऱ्याने एकरभर भेंडी केली नष्ट - ladies finger

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टोळेबंदीमुळे बाजार पेठांमधील मागणी घटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक शेतात सडून जात आहे. अशाच एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील भेंडी नष्ट केली आहे.

भेंडी नष्ट करताना शेतकरी
भेंडी नष्ट करताना शेतकरी

By

Published : Apr 10, 2020, 12:52 PM IST

Updated : Apr 10, 2020, 3:07 PM IST

परभणी- संपूर्ण देशावर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन आणि संचारबंदीची परिस्थिती ओढवली आहे. या परिस्थितीत सर्वाधिक भरकटला जात आहे, तो शेतकरी. शेतकऱ्यांना उत्पादित मालाला तसेच भाजीपाल्याला बाजारपेठच मिळत नसल्याने अनेक शेतकरी शेतातील पीक नष्ट करत आहेत. पाथरी तालुक्यातील अश्याच एका शेतकऱ्याने आपली एक एकरवरील भेंडी चक्क उपटून फेकून दिली आहे.

कोरोनाचा कहर : शेतकऱ्याने एकरभर भेंडी केली नष्ट

हेही वचा -'कोरोना'शी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिसांवर जिंतुरात पुष्पवर्षाव

पाथरी तालुक्यातील मौजे पाथरगव्हाण (बुद्रुक) गावातील शेतकरी शेषेराव घाडगे यांनी आपल्या शेतातील एक एकरमध्ये भेंडीची लागवड केली. पण, टाळेबंदीमुळे बाजारपेठ बंद असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याने भेंडी उपटून टाकली आहे.

हेही वाचा -'कोरोना'शी लढण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिसांवर जिंतूरात पुष्पवर्षाव, व्यापाऱ्यांचा उपक्रम

Last Updated : Apr 10, 2020, 3:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details