परभणी - जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई तीव्र झाली आहे. पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. पाणी मिळावे यासाठी परभणी जिल्ह्यातील शेतकरी पाण्यासाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. औरंगाबादमधील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर हे शेतकरी उपोषणाला बसले आहेत.
परभणी : जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण - hunger
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. जायकवाडी धरणातील पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जायचे कुठे असा प्रश्न जायकवाडी पाणी संघर्ष समितीने उपस्थित केला आहे.
परभणी : जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. जायकवाडी धरणातील पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जायचे कुठे असा प्रश्न जायकवाडी पाणी संघर्ष समितीने उपस्थित केला आहे. पाण्याअभावी परभणी जिल्ह्यातील शेती, तसेच जनावरांच्या जगण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे किमान एक पाण्याचे आवर्तन डाव्या कालव्यात सोडावे, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.