परभणी- जिथे प्यायला पाणी नाही, तेथे पिकांसाठी कुठून आणणार? अशी अवस्था पाथरी तालुक्यातील खेर्डा येथील शेतकऱ्यांची झाली आहे. येथील एका शेतकऱ्याने काढणीला आलेली केळीची बाग पाणी नसल्यामुळे उध्वस्त केली आहे. पाणी नसल्याने ही बाग करपून जात होती. त्यामुळे परिणामी शेतकऱ्याने झाडे तोडण्याचा निर्णय घेतला.
अनिता आत्माराम सिताफळे (खेर्डा, तालुका पाथरी) या महिला शेतकऱ्याची 1 हेक्टर शेती आहे. या शेतात त्यांनी गत वर्षी जुलै महिण्यात 3 हजार केळीची रोपे लावली होती. यासाठी त्यांनी दीड लाख रुपये खर्च केले. आता केळी काढणीच्या अवस्थेत असतान पाणी नसल्याने केळीची झाडे वाळून गेली. त्यामुळे हतबल झालेल्या सिताफळे यांनी झाडे तोडण्यास सुरूवात केली आहे.