परभणी- जिल्ह्यातील तापमान ४६ अंशावर पोहचल्याने उष्णतेची लाट आली आहे. या उष्माघातामुळे आज( शनिवारी) सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची सोनपेठ पोलिसांनी नोंद घेतली आहे.
परभणी जिल्ह्यात उष्माघाताचा बळी; बोंदरगाव येथील शेतकऱ्याचा मृत्यू - high temperature
उष्माघातामुळे शनिवारी सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
सोमेश्वर रघुनाथ सपकाळ (४२) असे उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर सूर्यनारायण आग ओकत आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. ताप, खोकला, घशाचे आजार वाढले आहेत. जास्त काळ उन्हात काम करणाऱ्यांना उन्हालीचा त्रास सहन करावा लागतो आहे. शुक्रवारी परभणी जिल्ह्यात तब्बल ४५.७ अंश सेल्सिअस तापमान होते.
रखरखत्या उन्हात सोमेश्वर सपकाळ यांनी बोंदरगाव शिवारातील आपल्या शेतात दिवसभर काम केले. सध्या ज्वारीचे खळे असल्यामुळे त्यांनी शेतातील आखाड्यावर रात्री मुक्काम केला. मात्र, शनिवारी सकाळच्या सुमारास त्यांचे चुलत भाऊ मोटर चालू करण्यासाठी गेले असता सोमेश्वर झोपलेले दिसले. त्यांच्या भावाने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उठले नाहीत. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले