परभणी- जिल्ह्यातील सेलू तालुक्यात ५० टक्क्यांहून कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके हातून गेली आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करावेत आणि दुष्काळ जाहीर करावा, यासह इतर विविध मागण्यांसाठी आज (गुरूवार) चिकलठाणा व वालूर महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी चिकलठाणा फाट्यावर सुमारे २ तास रास्तारोको करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी परभणीच्या सेलू येथे शेतकऱ्यांचा रास्तारोको - valur
विविध मागण्यासांठी शेतकऱ्यांनी सेलू तालुक्यात रास्ता रोको आंदोलन केले होते. जिल्हाधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे, पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारत तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, या रास्ता रोकोमुळे सेलू रोडवर जवळपास ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात होता. दरम्यान, दुपारी उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे, पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारत तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
वालुर आणि चिकलठाणा महसूल मंडळात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. अनेकांनी पेरण्या केल्या, परंतु पावसाअभावी पेरलेले उगवलेच नाही. ज्यांचे पीक उगवले ते कडक उन्हामुळे करपून जात आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करत दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी ३५ हजार रुपयांची मदत द्यावी. तसेच मागील खरीप हंगामातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीसाठी अनुदान द्यावे, मजुरांना काम द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात रामेश्वर गाडेकर, अशोक काकडे, राजेंद्र लहाने, रामराव उबाळे, पुरुषोत्तम पावडे, उद्धव बुधवंत, प्रशांत नाईक, भानुदास रासवे, अशोक खरात, दिलीप राके यांच्यासह सह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.